पती-पत्नीचा वाद सोडविणाऱ्या मेव्हण्यावरच मेव्हण्याचा हल्ला, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Published: May 21, 2024 11:10 PM2024-05-21T23:10:04+5:302024-05-21T23:10:36+5:30
Thane Crime News: पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणा?्या पातलीपाडा, घोडबंदर रोड येथील रहिवासी चंद्रकांत डोनेराव (वय २५) या मेव्हण्यावरच दारूच्या नशेत हल्ला केल्याची घटना घडली.
ठाणे - पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणा?्या पातलीपाडा, घोडबंदर रोड येथील रहिवासी चंद्रकांत डोनेराव (वय २५) या मेव्हण्यावरच दारूच्या नशेत हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी शरद पाईकराव (वय ३०, रा. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी दिली. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चंद्रकांत डोनेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शरद पाईकराव हा नेहमीच त्याची पत्नी प्रतिभा हिला दारूच्या नशेत कौटुंबिक कारणावरून मारहाण करीत होता. त्यामुळेच ती गेल्या पाच महिन्यांपासून तिच्या माहेरीच वास्तव्याला आहे. १९ मे २०२४ रोजी रात्री ११:३० वाजता शरद दारूच्या नशेतच पातलीपाडा येथील पत्नीच्या माहेरी आला. त्याने पत्नीला ह्यतू माज्या घरी येणार आहे की नाहीह्ण, असा जाब विचारला. यातूनच त्यांच्यात वाद झाला.
हा वाद मिटविण्याचा प्रयत्न प्रतिभाचा भाऊ चंद्रकात याने केला. त्यावेळी शरद याने पत्नी आणि सासू सासºयांना शिवीगाळ केली. त्यात चंद्रकात आणि सतीश या मेव्हण्यांनीही शरद याला समजविण्याचा प्रयत्न केला. याचाच राग आल्याने त्यांने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्याकडील चावीने चंद्रकांत याच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. यात तो जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. चंद्रकात याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी शरद याच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा गुन्हा कासारवडवली पोलिस ठाण्यात २० मे २०२४ रोजी दाखल केला आहे.