ठाण्यात एसटी स्थानकांत शुकशुकाट, दुपारपर्यंत अवघ्या १३ बस सुटल्या; १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:21 AM2017-10-18T06:21:56+5:302017-10-18T06:22:07+5:30
महाराष्ट्र परिवहन (एस टी) कर्मचाºयांनी ७ व्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या मंगळवारच्या बेमुदत संपाला ठाण्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
ठाणे : महाराष्ट्र परिवहन (एस टी) कर्मचाºयांनी ७ व्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या मंगळवारच्या बेमुदत संपाला ठाण्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या संपाची माहिती नसल्याने डेपोमध्ये आलेल्या शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान ठाणे विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणाºया आठ विभागातील एसटी डेपोमध्ये शुकशुकाट दिसत येत असताना, दुपारपर्यंत या विभागातून अवघ्या १३ गाड्या सुटल्या. त्यामुळे एसटीचे दिवसभराचे जवळपास ५० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. तसेच सोमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या संपामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवल्याने डेपोंना छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, संप काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने खाजगी बसना एसटी स्थानकातून प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, वंदना डेपोमधून दुपारपर्यंत अवघ्या ५ खाजगी गाड्या सातारा, पुणेकडे रवाना झाल्या. तर उर्वरीत ठिकाणी या खाजगी गाड्यांना प्रवासी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत ठाणे शहरातील दोन विभाग, भिवंडी, शहापूर, कल्याण, विठ्ठलवाडी अशा आठ विभाग येतात. त्या आठ विभागातून दिवसभरात ठाणे जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात (लांब पल्ल्याच्या) सुमारे २,८०० गाड्यांच्या फेºया नियोजित आहेत. परंतु, मंगळवारी दुपारीपर्यंत होणाºया १, ३८३ फेºयांपैकी अवघ्या १३ गाड्या सुटल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक ११ गाड्या या शहापूर येथून सुटल्या असून ठाणे, खोपट आणि विठ्ठलवाडी डेपोतून प्रत्येकी एक गाडी सुटली होती.
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाºयांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली. त्यानुसार, सोमवारी मध्यरात्री १२ नंतर एसटी कर्मचाºयांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. मात्र, ठाणे, खोपट डेपोतून सोमवारी रात्री ११.३० नंतर एकही गाडी सुटली नव्हती. पण, मंगळवारी सकाळी ५.३० च्या सुमारास एक गाडी खोपट डेपोमधून सोडण्यात आली.
पोलीस पाहून कर्मचारी भयभीत
विविध मागण्यासाठी एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान अचानक रात्री पोलीस बंदोबस्त आणि पोलीस गाड्या पाहून कर्मचारी भयभीत झालेले दिसत होते. त्यांच्या मनात पोलीस पडकतात की काय या भीतीने घर केले होते.
एकच गाडी सोडली
एसटी प्रशासनाच्या दडपणाखाली आणि चोख पोलीस बंदोबस्तात ठाणे-पुणे ही स्वारगेट गाडी पहाटे ५.३० च्या सुमारास सोडण्यात आली. सोडलेल्या गाडीच्या पुढे पोलीस व्हॅन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
३८ हजार कामगार सहभागी
विभागीय नियंत्रण कार्यालयात असलेल्या ८ विभागात सुमारे ३८ हजार ९८ अधिकारी-कर्मचारी हजेरी पटलावर आहेत. जवळपास ३८ हजार कामगार संपात सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अवघ्या ५ खाजगी गाड्या सुटल्या
या संपामुळे खाजगी गाड्या सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार,वंदना डेपोमधून सातारा, पुण्याला जाणाºया ५ ते ६ गाड्या रवाना झायाा असून दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी तीन गाड्या उभ्या होत्या. मात्र, प्रवासी संख्या कमी असल्याने त्या रिकाम्याच दिसत होत्या. तसेच बोरीवली येथेही खाजगी गाड्यांला प्रवासी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
तातडीचे काम राहिले
श्रीवर्धनला जाण्यासाठी खोपट स्थानकात बस पकडण्यासाठी जेव्हा दुपारी आलो. तेव्हा समजले एसटी कर्मचाºयांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यावेळी येथे माहिती घेतली असता एकही बस सुटणार नसल्याने समजले. त्यामुळे पुन्हा घरी परतण्याची वेळ ओढवली. यामुळे तातडीने जाण्याचे राहून गेले.
- सुशांत चव्हाण, प्रवासी
गटागटाने कर्मचारी उभे
संपामुळे बसेस डेपोसह कार्यशाळेत बसेस उभ्या केल्या होत्या. याचदरम्यान, संपात सहभागी झालेले कामगार हे डेपो परिसरात गटागटात उभे राहिल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.
कार्यशाळेत शांतता
नेहमीच एसटी कार्यशाळांमध्ये कर्मचाºयांची होणारी वर्दळीचा आणि बसेस दुरुस्ती होणारा आवाज या संपामुळे मंगळवारी ऐकू येत नव्हता. त्यामुळे कार्यशाळांमध्ये शांतता पसरल्याचे दिसून आली.