Thane: ठाण्यात सिमेंट मिक्सर ट्रक उलटला; अपघातानंतर वाहनचालकाचे पलायन, वाहतूकीलाही खाेळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 05:53 PM2023-05-09T17:53:00+5:302023-05-09T17:54:56+5:30
Thane: हिरानंदानी इस्टेट येथून कापूरबावडीकडे जाणाऱ्या रिकाम्या सिमेंट मिक्सर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ताे उलटल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून चालक गाडी सोडून ितथून पळून गेला.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - हिरानंदानी इस्टेट येथून कापूरबावडीकडे जाणाऱ्या रिकाम्या सिमेंट मिक्सर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ताे उलटल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून चालक गाडी सोडून तिथून पळून गेला. अपघातानंतर घटनास्थळी आईलही माेठया प्रमाणात पसरले हाेते. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा मिक्सर बाजूला करुन ऑईलचीही सफाई केल्यानंतर रस्ता वाहतूकीला माेकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मे. साईनाथ रोडवेज अँड कंपनी या कंपनीचा सिमेंट मिक्सर ट्रक हिरानंदानी इस्टेट ते कापूरबावडी या मागार्वरुन येतांना कापूरबावडी सर्कल येथे उलटल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कापूरबावडी पाेलीस, वाहतूक शाखेचे पाेलीस दाेन- क्रेन मशीनसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पहाटेच्या सुमारास दाखल झाले. रस्त्यावर उलटलेल्या ट्रकला वाहतूक पाे िलसांनी क्रेन मशीनच्या सहाय्याने सरळ करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्याचवेळी रस्यावर पसरलेल्या आईलचीही सफाई केली. या काळात झालेली वाहतूक काेंडीही अध्यार् तासाच्या अंतराने पाे िलसांनी सुरळीत केली.