Thane: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे ते भिवंडीचा नाशिक महामार्ग आठ पदरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

By जितेंद्र कालेकर | Published: July 30, 2023 04:41 PM2023-07-30T16:41:10+5:302023-07-30T16:41:50+5:30

Thane: ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे.

Thane: Chief Minister's order to make Thane to Bhiwandi Nashik highway eight-lane to avoid traffic congestion | Thane: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे ते भिवंडीचा नाशिक महामार्ग आठ पदरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Thane: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे ते भिवंडीचा नाशिक महामार्ग आठ पदरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

googlenewsNext

- जितेंद्र कालेकर
ठाणे - ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच लहान वाहनांना रस्ता मिळण्यासाठी मोठी वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भातची अंमलबजावणे करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली. तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याच्या सूचनाही यावेळी यंत्रणांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळीच ठाणे ते नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खडयांसंदर्भात यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी रविवारी स्वत: रस्त्यावर उतरून या महामागार्ची पाहणी केली. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ मास्टिक पद्धतीने बुजविण्याच्या आदेश संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व यंत्रणांच्या अधिकाºयांना सोबत घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या मार्गाची पाहणी केली. ठाणे- नाशिक महामार्गावरील पडघा पर्यंतच्या रस्त्याचे आठपदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. तसेच ज्या ठिकाणी पंक्चर आहेत किंवा कट आहेत, ते बंद करावेत. त्याचबरोबर रस्ता ओलांडून गावात जाण्यासाठी असलेल्या ठिकाणी हाईट बॅरिअर लावून मोठया वाहनांना वळण्यासाठी बंदी करावी. रस्त्याच्या डाव्या बाजूनेच मोठी वाहने चालविण्यात यावीत, जेणेकरून लहान वाहने व रुग्णवाहिकांना एका बाजूने रस्ता मोकळा मिळेल. मोठी वाहने रस्त्यावर आल्यास ही वाहने थांबविण्यासाठी काही ठिकाणी तात्पुरत्या पार्किंगची सुविधा करावी. त्या ठिकाणी वाहन चालकांसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करावे तसेच इतर सुविधा पुरविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या आहेत.

राजनोली व माणकोली येथील उड्डाणपुलाखालील रस्ते व्यवस्थित करून घ्यावेत, जेणेकरून गर्दीच्या काळात या ठिकाणी अवजड वाहने थांबविता येतील. तसेच माणकोली येथील वाहतुकीस अडथळा येणारी दुकाने, गाळे तेथून हटविण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. ठाणे ग्रामीण मुख्यालयाच्या जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी- ठाणे ग्रामीण पोलीसांच्या मुख्यालयासाठी निश्चित केलेल्या सापे येथील जागेचीही तसेच काही दिवसांपूर्वी पडघ्यातील खडवली फाटा येथे अपघात झाला होता. त्या स्थळाची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली. या ठिकाणी सेवा रस्ता तातडीने करण्याचे तसेच भिवंडी येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्यांना त्यांनी दिले.

यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रकाश पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश 
पावसाने काहीशी उसंत घेतल्याने मुंबई शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिले. तसेच मुंबई व परिसरातील रेल्वे स्थानकांजवळचे रस्ते, रेल्वे मार्गावर पाणी साचणारी ठिकाणे आदी तातडीने स्वच्छ करून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देशही त्यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले. तसेच एमएमआरडीए विभागात येणार्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या सूचनाही एमएमआरडीए आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या आहेत.

Web Title: Thane: Chief Minister's order to make Thane to Bhiwandi Nashik highway eight-lane to avoid traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.