ठाण्यातील नागरिकांनी दिवाळीमध्ये पाळली आवाजाची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:47 PM2019-10-30T23:47:06+5:302019-10-30T23:48:21+5:30

दिवाळी पहाट कार्यक्रमांमुळे मात्र ध्वनिप्रदूषणाने गाठली ११० डेसिबलची पातळी, मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना नापसंती

Thane citizens observe Diwali limit | ठाण्यातील नागरिकांनी दिवाळीमध्ये पाळली आवाजाची मर्यादा

ठाण्यातील नागरिकांनी दिवाळीमध्ये पाळली आवाजाची मर्यादा

googlenewsNext

ठाणे : गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात ध्वनिप्रदूषणाबाबत झालेल्या जनजागृतीचा परिणाम दिवाळीत दिसून आला. मागील वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाची पातळी १२५ पेक्षाही कमी झाल्याचे पाहणीत आढळले होते. यंदा मात्र त्यात आणखी फरक पडल्याचे दिसले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाची पातळी ८५ डेसिबलपर्यंतच असल्याचे पाहणीत दिसले. वाढत्या जनजागृतीमुळे मोठ्या आवाजांच्या फटाक्यांचे प्रमाण कमी होऊन आतषबाजीच्या फटाक्यांची मागणी मात्र वाढल्याचे दिसून आले.

मागील काही वर्षांपासून ठाण्यातील दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर हे ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात लढा देत आहेत. ठाणे महापालिका, पोलीस व इतर सामाजिक संस्थांनीही दिवाळीत ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृती केल्याने तीन ते चार वर्षांपासून मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मागील वर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शहरात ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण हे १२५ डेसिबल पेक्षा कमी होते. यंदा मात्र या दिवशी ते काहीअंशी वाढले असले तरी आवाजाचे प्रमाण हे ८५ डेसिबलपेक्षा कमी असल्याची माहिती बेडेकर यांनी दिली. या दिवशी शहरातील नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड आदी भागातदेखील फटाके फोडण्याचे प्रमाण फारच कमी झाल्याचे आढळले आहे. पहिल्या दिवशी तर ते फारच कमी होते. तिसऱ्या दिवशी मात्र तेफारच तुरळक दिसल. केवळ लक्ष्मी पुजनाच्याच दिवशीच शहरात अधिक फटाके फोडले गेले.

मागील काही वर्षांत केलेली जनजागृती आणि शाळांनीदेखील विद्यार्थ्यांना केलेले प्रबोधन यामुळे यंदा त्याचा फायदा झाला असून शहरातील उच्चभ्रूवस्ती सोडल्यास इतर ठिकाणी मात्र ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण हे मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी आढळले आहे. मुलांनीदेखील आवाजाच्या फटाक्यांपेक्षा फॅन्सी फटाके वाजविण्यावर भर दिला आहे.

तलावपाळी, राम मारुती रोड येथे डिजे साउंडमुळे आवाज मोठा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे ५.३० वाजता राम मारुती रोड येथे आवाजाची मर्यादा ५५ ते ६० डेसिबल होती. तर तलावपाळी येथे सकाळी ६ वाजता ही मर्यादा ६५ ते ७५ डेसिबल होती. तर पाचपाखाडी भागात ६.३० वजाता ही मर्यादा ७० डेसिबल पर्यंत होते. तर सकाळी ८.३० वाजता तलावपाळी आणि राम मारुती रोड येथे दिवाळी पहाटच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमुळे डीजे साउंडमुळे आवाजाची मर्यादा १०० ते ११० पर्यंत गेली होती. सकाळी ९.३० वाजताही हीच परिस्थिती होती. तर याच दिवशी सांयकाळी ७.३० ते रात्री १०.३० पर्यंत तलावपाळी, पाचपाखाडी, राम मारुती रोड, हिरानंदानी मेडोज या भागात ध्वनीची पातळी८० ते ८५ डेसिबलपर्यंत होती.

Web Title: Thane citizens observe Diwali limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.