ठाणे शहरात प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु, ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या रु ग्णांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:19 PM2020-04-11T19:19:40+5:302020-04-11T19:21:04+5:30

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार शहारात २० ठिकाणी हे विभाग सुरु करण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोनाची लक्षणे आढळणाºयांची नोंदणी केली जाणार आहे.

In Thane city ward committee-based fever outpatient department will start, check for symptoms related to fever, cough and difficulty breathing. | ठाणे शहरात प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु, ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या रु ग्णांची होणार तपासणी

ठाणे शहरात प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु, ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या रु ग्णांची होणार तपासणी

Next

ठाणे : ठाणे शहरात कोरोना या विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी आणि रु ग्णांची तात्काळ तपासणी करणे सोयीस्कर व्हावे यासाठी ठाणे शहरामध्ये प्रभाग समितीनिहाय १५ महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये तर ५ खासगी रूग्णालये अशा एकूण २० ठिकाणी ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. या बाह्यरूग्ण विभागामध्ये केवळ ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होणे याप्रकारची लक्षणे असणाऱ्या रु ग्णांचीच तपासणी करण्यात येणार आहे. ठाणे शहरात कोरोना या आजाराच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के यांनीही पाठपुरवठा केला होता.
             प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभागात महापालिकेच्या १५ आरोग्य केंद्राचा समावेश आहे. यामध्ये कौसा आरोग्य केंद्र, दिवा केंद्र, कळवा आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, किसननगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, नौपाडा आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, काजुवाडी आरोग्य केंद्र, कोपरी आरोग्य केंद्र, रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, गांधीनगर आरोग्य केंद्र, शिळ आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरस आरोग्य केंद्र, आतकोनेश्वरनगर आरोग्य केंद्र या महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे तर कौशल्या हॉस्पीटल, ठाणे ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पीटल, ठाणे वेदांत हॉस्पीटल, जितो एज्युकेशनल अ‍ॅन्ड मेडिकल ट्रस्ट या ५ खाजगी हॉस्पिटलमध्ये ताप बाह्यरूग्ण तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
ताप बाहयरु ग्ण विभाग सुरू केलेल्या आरोग्य केंद्रांमधील जनरल ओपीडी पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येणार असून सदर विभाग दैनंदिन सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत कार्यान्वित राहणार आहेत. तसेच महापालिका दवाखान्यांमध्ये अँटीरेबिज उपचार आणि आरोग्य केंद्रातील इतर लसीकरणासाठी आदी उपचार दुपारी २ नंतर सुरु ठेवण्यात येणार आहेत.
ताप बाहयरु ग्ण विभागाकरीता कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करण्यात येणार नसून याठिकाणी केवळ ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होणे याप्रकारची लक्षणे असणार्या रु ग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या केंद्रातील रु ग्णांचे कमी स्वरूपाची लक्षणे, मध्यम स्वरूपाची लक्षणे आणि अतिशय तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारे रूग्ण तीन विभागामध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे.
वैद्यकिय अधिकारी त्यांच्या वैद्यकिय अहवालानुसार रु ग्णांची वर्गवारी केल्यानंतर ज्या रु ग्णांची कोविड तपासणी करणे आवश्यक आहे अशा रु ग्णांना (कॅटॅगरी १ माईल्ड केसेस) भार्इंदरपाडा येथील कोरोना केअर सेंटर येथे अ‍ॅम्ब्युलन्सव्दारे पाठविण्याचा निर्णय घेतील. भार्इंदरपाडा येथे सदर रु ग्णांना दाखल करु न त्यांचे स्वॅब घेण्यात घेवून या ठिकाणी या रु ग्णांना त्यांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत ठेवण्यात येणार आहे. हे रु ग्ण कोविड पॉझटिव्ह आढळल्यास त्यांना पुढील उपराचारार्थ सिव्हील हॉस्पिटल ठाणे किंवा होरायझोन प्राईम हॉस्पिटल, पातलीपाडा येथे प्राधिकृत कोविड रु ग्णालयामध्ये दाखल करण्यात येईल. फिव्हर ओपीडीमध्ये आलेल्या कॅटॅगरी २ व ३ मधील रु ग्णांना पुढील उपचारार्थ व तपासणीकरीता त्यांच्या क्षमतेनुसार बेथनी हॉस्पिटल, पोखरण किंवा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे संदर्भीत करण्यात येणार आहे. बेथणी हॉस्पिटल व छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे रु ग्णांची थ्रोट स्वॅब व्दारे तपासणी करु न पुढील निदान करण्यात येणार आहे.
फिव्हर ओपीडी मध्ये आलेल्या रु ग्णांकरीता स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात येणार असून रजिस्टरमध्ये रु ग्णाचे नाव संपूर्ण पत्ता, संपर्कतपशिल आदी माहिती घेण्यात येणार आहे. ज्या रु ग्णांना संदर्भसेवा देणे आवश्यक नसेल अशा रु ग्णांना ओपीडीमधूनच औषधोपचार दिला जाणार आहे. फिव्हर ओपीडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जनरल ओपीडी मधील रु ग्णांचा समावेश होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. रु ग्णांना संदर्भीत करण्याकरीता प्रभाग समिती निहाय १ अम्ब्युलन्स उपलब्ध करु न देण्यात आली असून फिव्हर ओपीडीमध्ये रु ग्णांची तपासणी करताना वैद्यकिय अधिकारी आणि रु ग्णांना संदर्भसेवा देताना अ‍ॅम्ब्युलन्सवरील सर्व कर्मचाऱ्यांनी देखील पीपीई किटसचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे.
 

Web Title: In Thane city ward committee-based fever outpatient department will start, check for symptoms related to fever, cough and difficulty breathing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.