प्रत्येक बुधवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद

By admin | Published: November 17, 2015 12:51 AM2015-11-17T00:51:49+5:302015-11-17T00:51:49+5:30

भातसा धरण व उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी ३० टक्के पाणीकपात करण्याचे ठरविल्याने ठाणे महापालिकेची

Thane city water supply stopped every Wednesday | प्रत्येक बुधवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद

प्रत्येक बुधवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Next

भातसा धरण व उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी ३० टक्के पाणीकपात करण्याचे ठरविल्याने ठाणे महापालिकेची स्वत:ची योजना व स्टेम कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा यापुढे दर बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत घोडबंदर रोड, पाचपाखाडी, ऋ तुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, बॉम्बे कॉलनी, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येणार असून नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Web Title: Thane city water supply stopped every Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.