ठाणे सिव्हील रुग्णालय नवीन वास्तुतील स्थलांतरासाठी सज्ज; ३५० जनरल खाटा, ४० ICU 

By सुरेश लोखंडे | Published: May 18, 2023 06:04 PM2023-05-18T18:04:21+5:302023-05-18T18:04:35+5:30

ठाण्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या खोदकामाला सुरुवात झाली आहे.

Thane Civil Hospital ready to shift to new building 350 general beds, 40 ICUs | ठाणे सिव्हील रुग्णालय नवीन वास्तुतील स्थलांतरासाठी सज्ज; ३५० जनरल खाटा, ४० ICU 

ठाणे सिव्हील रुग्णालय नवीन वास्तुतील स्थलांतरासाठी सज्ज; ३५० जनरल खाटा, ४० ICU 

googlenewsNext

ठाणे : येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या खोदकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत सिव्हील रुग्णालयाचे स्थलांतर मनाेरूग्णालयात परिसरातील आराेग्य विभागाच्या इमारतीत स्थलांतर करण्याचा मार्ग आता माेकळा झाला आहे. आठवड्याभरात हे रूग्णालय नवीन जागेत सुरू हाेणार आहे. या इमारतीत रूग्णांसाठी तब्बल ३५० जनरल खाटा, ४० आयसीयू, १५ डायलिसिसची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हा आरोग्य प्रशासनाने या सिव्हील रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर हाती घेतले आहे. या नवीन ठिकाणी अतिदक्षता विभाग, रक्तपेढी अपघात, महिला बाल, प्रसूतीकक्ष, अध्यावत तयार केले केले जात आहे. नेत्र, आयुष, किचन, सिटीस्कॅन, शवाघर आदी विभागाची कामे प्रगती पथावर आहेत. जनरल विभागात रुग्णांसाठी ३५० खाटाचा कक्ष बांधला असून, पुढल्या आठवड्यात बाह्यरुग्ण (ओपीडी) कक्ष रुग्णांच्या सेवेसाठी खुला होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भूमिपूजनाचा कार्यक्रम अलिकडेच पार पडला. त्यानंतर लगेचच त्याठिकाणी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र दरम्यानच्या वेळेत रुग्णांना त्रास होणार नाही, याची दक्षता सिव्हील रुग्णालयाने घेतली होती. अडोशाच्या जागेत महत्वाचे वैद्यकीय कक्ष सुरू ठेवून रुग्णसेवा चालू ठेवली आहे. त्यानंतर आता संपूर्ण सिव्हील रुग्णालय मनोरुग्णालया जवळील आरोग्य विभागाच्या जागेत हलवण्यात येत आहे. या नवीन ठिकाणी रुग्णालयाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

अतिदक्षता विभागाच्या तब्बल ४० खाटा  
रुग्णालयात सर्व कक्ष अद्यावत करण्यात येणार आहेत. या मध्ये अतीदक्षता विभागात ४० खाटा ठेवण्यात आल्या आहेत. डायलिसिस १५, नवजात बालकांच्या अतिदक्षता विभाग २४ खाटा, पोषण पुनर्वसन केंद्रात १०, प्रसूती कक्षासाठी ३५ तर जनरल वॉर्डसाठी ३५० खटांची तयारी केली आहे. तर रक्तपेढीचे काम पूर्ण झाले आहे
 

Web Title: Thane Civil Hospital ready to shift to new building 350 general beds, 40 ICUs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.