ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल 'या' ठिकाणी स्थलांतराच्या जोरदार हालचाली!

By सुरेश लोखंडे | Published: September 5, 2022 03:01 PM2022-09-05T15:01:39+5:302022-09-05T15:03:59+5:30

या सिव्हिल रुग्णालयात सर्जरी, फिजिओथेरपी,आर्थो, इएनटी, आयसीयु आदी जनरल विभाग काही काळ कार्यरत ठेवण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या जागेवर आता लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला प्रारंभ होणार आहे.

Thane civil hospital strong movement of shift to mental hospital | ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल 'या' ठिकाणी स्थलांतराच्या जोरदार हालचाली!

ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल 'या' ठिकाणी स्थलांतराच्या जोरदार हालचाली!

Next

ठाणे : येथील जिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या महिन्याभरात मनोरुग्णालय वास्तूच्या परिसरात स्थलांतर करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. यामध्ये मुलांच्या वार्डसोबत डिलिव्हरी वॉर्ड, नेत्रविभाग,  ब्लडबँक आदी कक्ष मनोरुग्णालया जवळील शासकीय इमारतीत या महिना अखेर स्थलांतरित  होत असल्याच्या वृत्तास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दुजोराही दिला आहे.

या सिव्हिल रुग्णालयात सर्जरी, फिजिओथेरपी,आर्थो, इएनटी, आयसीयु आदी जनरल विभाग काही काळ कार्यरत ठेवण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या जागेवर आता लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी अतिदक्षता विभाग, कुपोषित बालकांचे सेंटर,  किचन, मुलांचा कक्ष,  डिलिव्हरी, नेत्रविभाग,  ब्लडबँक आदी कक्ष मनोरुग्णालया जवळील जागेत स्थलांतर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जात आहे. या हॉस्पिटलच्या बांधकामाचे सर्व अडथळे दूर निविदेचं काम पूर्णत्वास आले आहे. ६ सप्टेंबरपर्यंत विविध ठेकेदार कंपन्यांनकडून निविदा मागविल्या आणि ८ सप्टेंबरला निविदा उघडण्याचे नियोजन केले आहे.

या सिव्हिल रुग्णालयाच्या जागी तीन बेसमेंट आणि दहा मजली  बांधकाम असणाऱ्या दोन भव्य इमारतीत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल. या हॉस्पिटलचे बांधकाम करण्यापूर्वी येथील काही रुग्ण विभाग मनोरुग्णांलय परिसरात स्थलांतरित होत आहेत. या मनोरुग्णालया जवळील जागेत रुग्णसेवा देतेवेळी कोणत्या अडचणी येणार नाहीत, याचे चाचपणी डॉ. पवार यांनी आज केल्याचेही निदर्शनात आले आहे. तयार होणाऱ्या या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह २०० सुपर स्पेशालिटी बेड, २०० महिला, लहान मुलं आणि अत्याधुनिक डिलिव्हरी कक्ष तयार होऊ घातला आहे. याशिवाय ५०० बेडचे जनरल हॉस्पिटल आदी ९०० खाटांचे हे भलेमोठे रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेत येत आहे.

Web Title: Thane civil hospital strong movement of shift to mental hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे