ठाणे जिल्हाधिकारी - कोषागार  कार्यालयाच्या सुरक्षेसाठी शीघ्र कृती दलाच्या जवानांकडून रेकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 07:39 PM2018-03-31T19:39:02+5:302018-03-31T19:39:02+5:30

मुंबईतील २६/११ च्या हल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात नॅशनल सिक्युरीटी गार्डच्या (एनएसजी)धर्तीवर फोर्स वन व संबंधीत जिल्ह्यात जलद प्रतिसाद पथक म्हणजे शीघ्र कृती दलाची स्थापना झाली. त्याव्दारे कोणत्या प्रकारच्या अतिरेकी हल्यास प्रत्युत्तर देण्यात येईल. यास अनुसरून ठाणे शहरातील अतिमहत्त्वाच्या संवेदनशील ठिकणांची रेकी व पाहणी करून त्या ठिकाणी मॉकड्रील म्हणजे कमांडो सराव घेतला जात आहे.

Thane collector - Reiki from Rapid Action Force jaw for the security of treasury office | ठाणे जिल्हाधिकारी - कोषागार  कार्यालयाच्या सुरक्षेसाठी शीघ्र कृती दलाच्या जवानांकडून रेकी

Thane-collector

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी व कोषागार कार्यालय आवारासह जिल्हा सत्र न्यायालयाच्या रस्त्यावर काळ्या कपड्यातील जवानांसह कमांडोचे पथक घातपात झाल्याच्या शंकेचे पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकलीठाणे शहरातील अतिमहत्त्वाच्या संवेदनशील ठिकणांची रेकी व पाहणी

ठाणे: येथील जिल्हाधिकारी व कोषागार कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रणातील शिघ्र कृती दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळीच या परिसरातील ठिकठिकाणची रेकीव्दारे सखोल पहाणी केली. याशिवाय अतिरेकी हल्ला रोखण्याच्या दृष्टीने रंगित तालीमचे (मॉक ड्रील) प्रात्यक्षिक देखील करण्यात आले.
येथील कोर्ट नाका परिसरातील जिल्हाधिकारी व कोषागार कार्यालय आवारासह जिल्हा सत्र न्यायालयाच्या रस्त्यावर काळ्या कपड्यातील जवानांसह कमांडोचे पथक फिरताना ठाणेकराना आढळून आले. काही घातपात झाल्याच्या शंकेचे पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकली. पण सखोल चौकशी केली असता या संवेदनशील कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची रेकी व मॉक ड्रील सुरू असल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून सांगण्यात आले. भविष्यातील संभाव्य धोक, घातपात लक्षात घेऊन या शीघ्र कृती दलाव्दारे परिसरातील ठिकठिकाणांच्या कार्यालयांची पाहणी करून रंगीत तालीम देखील केली जात आहे.
मुंबईतील २६/११ च्या हल्यानंतर महाराष्ट्र  पोलीस दलात नॅशनल सिक्युरीटी गार्डच्या (एनएसजी)धर्तीवर फोर्स वन व संबंधीत जिल्ह्यात जलद प्रतिसाद पथक म्हणजे शीघ्र कृती दलाची स्थापना झाली. त्याव्दारे कोणत्या प्रकारच्या अतिरेकी हल्यास प्रत्युत्तर देण्यात येईल. यास अनुसरून ठाणे शहरातील अतिमहत्त्वाच्या संवेदनशील ठिकणांची रेकी व पाहणी करून त्या ठिकाणी मॉकड्रील म्हणजे कमांडो सराव घेतला जात आहे. यामुळे कार्यालयाच्या परिसराचा संपूर्ण आराखडा या जवानाच्या नजरेत खालून घालण्यासाठी गोपनीय ठिकाणांची पाहणी देखील या कंमांडोंच्या प्रमुखांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आली.
 

Web Title: Thane collector - Reiki from Rapid Action Force jaw for the security of treasury office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.