खड्ड्यांच्या तक्रारी ठाणे जिल्हा विधी सचिवांकडे करता येणार! उच्च न्यायालयाकडून नोडल अधिकारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 02:13 AM2017-08-25T02:13:35+5:302017-08-25T02:13:38+5:30
जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगरपालिका यांच्या क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व त्यांच्या दुरवस्थेविषयीच्या नागरिकांना यापुढे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांकडे तक्रार करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
ठाणे : जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगरपालिका यांच्या क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व त्यांच्या दुरवस्थेविषयीच्या नागरिकांना यापुढे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांकडे तक्रार करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील मनपा, नगरपालिकांच्या बांधकाम विभागांसह ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने जनतेच्या तक्र ारींची दखल घेण्यासाठी ठाणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दु.न. खेर यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली आहे. जनहित याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या या ‘नोडल अधिकाºयांकडे आता दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना चांगल्या रस्त्यांसाठी तक्रारी करता येणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर आणि मीरा-भार्इंदर या सहा महापालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर दोन नगरपालिकांमधील याशिवाय, पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह खड्ड्यांच्या तक्रारी करण्याचा अधिकार नागरिकांना मिळाला आहे.
चांगल्या रस्त्यांसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील खराब रस्त्यांची तक्रार नागरिकांनी ई-मेल पोस्ट किंवा प्रत्यक्ष भेटूनही करता येणार आहे. यासाठी नोडल अधिकाºयांचा पत्ता- सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पहिला मजला, न्याय सेवा सदन, जिल्हा न्यायालय परिसर, कोर्टनाका, ठाणे पश्चिम असा आहे. याशिवाय ’ीँ’ं्र३िँंल्ली@८ंँङ्मङ्म.ूङ्मे या ई-मेलद्वारे नागरिकांना तक्रारी करता येणार आहे.