Thane: संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा काँग्रेसकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 03:10 PM2023-07-29T15:10:45+5:302023-07-29T15:20:08+5:30
Thane: अमरावती जिल्ह्यांतील वडनेरा येथे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरुद्ध अवमानकारक वक्तव्याच्या संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली
ठाणे - अमरावती जिल्ह्यांतील वडनेरा येथे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरुद्ध अवमानकारक वक्तव्याच्या संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली,ठाण्यातील काँग्रेसच्या वतीनेही संभाजी भिडे यांच्या विरोधात निषेध करून निदर्शने करण्यात आली.
ठाणे - संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा काँग्रेसकडून निषेध. (व्हिडीओ- विशाल हळदे ) #Congress#thane#SambhajiBhidepic.twitter.com/KxVWiRYJaq
— Lokmat (@lokmat) July 29, 2023
ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शनास "राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे" ,संभाजी भिडे हाय हाय,आदी घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी बोलताना शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,ज्यांनी या देशाला शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. अंखड भारताचे स्वप्न पाहिले ज्या व्यक्तीने संपूर्ण जगाला आपली ओळख निर्माण केली. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल कायम वादात असलेले मनुवादी विचारसरणी असलेले संभाजी भिडे यांनी अवमानकारक वक्तव्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असून संभाजी भिडे हे भारतीय जनता पार्टीचे पिल्लू असून लहान सहान गोष्टी करिता त्वरित पाउले उचलणारे हे शिंदे-फडणवीस-पवार सरकार जोपर्यंत संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करीत नाही तोपर्यंत काँग्रेस आपले आंदोलन चालूच ठेवेल असा इशाराच शेवटी त्यांनी दिला.