ठाण्यात लक्षणे नसणाऱ्या कोरोना बाधितांवर होणार घरातच उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:31 AM2020-05-25T01:31:10+5:302020-05-25T01:44:52+5:30

एकीकडे ठाणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्याप्रमाणात रुग्णालय आणि त्यातील खाटांची संख्या मात्र अपूरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे ज्यांना लक्षणे नाहीत, अशा कोरोना बाधितांवर सोय असल्यास त्यांच्या घरातच उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

 In Thane, corona sufferers without symptoms will be treated at home | ठाण्यात लक्षणे नसणाऱ्या कोरोना बाधितांवर होणार घरातच उपचार

ठाणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

Next
ठळक मुद्देठाणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णयवाढत्या रुग्ण संख्येमुळे पालिकेने घेतला केंद्रीय नियमावलीचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात रोज कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता यापुढे कोणतीही लक्षणे नसणाऱ्यांवर त्यांच्या घरातच उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचा भार काही प्रमाणात हलका होणार असला तरी दाटीवाटीच्या वस्तीमध्ये मात्र अशा उपचारांना मर्यादा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकीकडे ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, मुंब्रा, मानपाडा, लोकमान्यनगर आणि नौपाडा या प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २२ मे रोजी एकाच दिवशी १९७ रुग्णांची यात भर पडली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरही प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सध्या शहरात तीन हजार खाटांची निर्मिती करण्यात आली असून येत्या काही दिवसांमध्ये पालिका प्रशासनाकडून दहा हजार खाटांची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे ८५ टक्के रुग्णांमध्ये खोकला, ताप, सर्दी अशी कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांच्या तपासणीचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. अशा रुग्णांना जर त्यांचा स्वत:चा बंगला अथवा दोन बेड रुमचा फ्लॅट असेल तर त्यांच्यावर घरातच उपचाराचे नियोजन केले जात आहे. ज्या रुग्णांना लक्षणांसह जास्त प्रमाणात त्रास असेल त्यांना शक्यतो रुग्णालयांमध्ये दाखल केले जाणार असल्याचे महापालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाढती रुग्णसंख्या आणि त्याप्रमाणात अपुरी पडणारी रुग्णालये यासाठीही या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी होणार आहे. परंतू, दाटीवाटीच्या वस्ती तसेच झोपडपट्टी परिसरातील वाढत्या रुग्णांवर ही उपचार पद्धती लागू करण्यात अनेक अडचणी असल्याचे एका वैद्यकीय अधिका-याने सांगितले. त्यामुळे वागळे इस्टेट, मुंब्रा, लोकमान्यनगर, रायलादेवी आणि मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रातील अशा रुग्णांवर पालिका प्रशासन कशा प्रकारे उपचार करणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
........................
अशी आहे रुग्णांची स्थिती
ठाणे महापालिका क्षेत्रात २३ मे अखेरपर्यंत १८९१ रुग्णांची नोंद झाली. यात ६५ जणांचा मृत्यु झाला असून ५८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

----------------------------

 

‘‘ ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १९०० रुग्णांची नोंद झाली आहे. रोज १०० ते १५० रुग्णांची यात भर पडत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या नविन मार्गदर्शक तत्वानुसार ज्या ८५ टक्के रुग्णांना लक्षणे आणि त्रासही नाही, अशांवर सोय असल्यास घरातच उपचार केले जाणार आहेत. मुळात, कोरोना झाल्यानंतर त्याच्यापासून अन्य कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य सेतू डाऊनलोड करुन त्यानुसार हे उपचार केले जातील. पण ज्याला जास्त त्रास असेल त्यांना मात्र तातडीने रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.’’
अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका

 

Web Title:  In Thane, corona sufferers without symptoms will be treated at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.