Thane Coronavirus Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४८८ रुग्ण नव्याने आढळले; १५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 09:57 PM2021-06-25T21:57:42+5:302021-06-25T21:58:00+5:30
उल्हासनगरला सात रुग्ण आढळले असून दोन मृत्य आहे. या शहरात २० हजार ७४१ बाधीत असून मृत्यू संख्या ४९३ नोंदवली आहे.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ४८८ रुग्ण शुक्रवारी आढळून आले असून १५ जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या पाच लाख ३० हजार २८८ झाली असून दहा हजार ६११ मृतांची नोंद झाली आहे.
ठाणे शहरात १०६ रुग्ण सापडले असून या शहरात आतापर्यंत एक लाख ३२ हजार ८५६ रुग्ण नोंदले आहेत. तर तीन मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या दोन हजार दोन मृत्यू आहे. कल्याण - डोंबिवलीला ९९ रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू झाला.या शहरात आता एक लाख ३५ हजार ९०१ बाधीत असून दोन हजार.५८६ मृतांची नोंद झाली.
उल्हासनगरला सात रुग्ण आढळले असून दोन मृत्य आहे. या शहरात २० हजार ७४१ बाधीत असून मृत्यू संख्या ४९३ नोंदवली आहे. भिवंडीला चार रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. येथे दहा हजार ५९९ बाधितांची तर, ४५६ मृतांची नोंद केली. मीरा भाईंदरला ५४ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात आता ५० हजार ४१६ बाधितांसह एक हजार ३२६ मृतांची नोंद आहे.
अंबरनाथ शहरात १४ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. या शहरात आता १९ हजार ६६७ बाधितांसह मृतांची संख्या ५०७ आहे. बदलापूरला २० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण २० हजार ९९९ असून एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूची संख्या ३४० आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ५० रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले आहे. या गांवपाड्यांत ३९ हजार बाधीत झाले असून आता एक हजार १७३ मृतांची नोंद झाली आहे.