ठाण्याचे नगरसेवक कल्याणमध्ये; शिवसेनेत कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 02:17 AM2019-04-21T02:17:50+5:302019-04-21T02:18:16+5:30

प्रचाराचे नियोजन कोलमडले

Thane corporator in Kalyan; Shivsenaite whisper | ठाण्याचे नगरसेवक कल्याणमध्ये; शिवसेनेत कुजबुज

ठाण्याचे नगरसेवक कल्याणमध्ये; शिवसेनेत कुजबुज

googlenewsNext

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी हे कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात अधिक सक्रिय असल्याची ठाण्यात कुजबुज सुरू झाली आहे. यामुळे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हेही दबावाखाली आले आहेत. त्याचवेळी राष्टÑवादी काँग्रेसमध्ये शिस्तबद्ध प्रचार सुरू आहे. शिवसेनेच्या प्रचारात नियोजनाचा अभाव असल्याचे दिसत आहे. रॅलीची वेळ कार्यकर्त्यांना धड कळत नाही. प्रचारासाठी कार्यकर्त्यांची शोधाशोध सुरू आहे, असे सेनेतील मंडळींनीच सांगितले.

ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत राजन विचारे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना वरचढ ठरली आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक सहज जिंकू, असा आत्मविश्वास ठाण्यातील शिवसैनिकांना वाटू लागला आहे. त्यामुळे प्रचार तरी कशाला करायचा, असा प्रश्न काही शिवसैनिकांना पडला आहे. या आत्मविश्वासामुळेच की काय, प्रचार रॅली काढण्याचे नियोजन आदल्या दिवशी ठरत नसल्याने प्रचार कसा व कुठे करायचा, या बुचकळ्यात शिवसैनिक पडले. विचारे यांच्या आक्रमक शैलीमुळे काही शिवसैनिक त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. त्यामुळे काही नगरसेवक, पदाधिकारी हे कल्याणमध्ये डॉ. शिंदे यांच्या नियोजनबद्ध प्रचारात सहभागी होणे पसंत करत आहेत. शिवाय, श्रीकांत यांची पाठराखण केली, तर पालकमंत्री एकनाथ शिंदे खूश होतील व भविष्यात फायदा होईल असे त्यांना वाटत आहे. शिवाय, तुम्ही ठाण्यातील नगरसेवक, पदाधिकारी आहात, तर तेथे प्रचार करा, असे सांगायला शिंदे यांचीही जीभ रेटत नाही.

शिवसेनेकडून पलटवार नाही
राष्टÑवादीकडून आरोप होत असताना शिवसेनेकडून कोणत्याही स्वरूपाचा पलटवार होताना दिसत नाही. त्यामुळे प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता अटीतटीची झाल्याची चर्चा दबक्या आवाजात शिवसैनिकांत आहे. आम्हाला अतिआत्मविश्वास त्रासदायक ठरू शकतो, असे मत एका ज्येष्ठ शिवसैनिकाने व्यक्त केले. येत्या काही दिवसात याच मुद्द्यावर शिवसैनिक तसेच अन्य पक्षांमध्ये चर्चेला ऊत येणार असे काही राजकीय जाणकारांचे मत आहे.

Web Title: Thane corporator in Kalyan; Shivsenaite whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.