ठाणे : फुटबॉल टर्फला नगरसेवकांची किक! प्रस्ताव अखेर तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:33 AM2018-01-23T02:33:13+5:302018-01-23T02:33:22+5:30

ठाणे महापालिकेच्या वतीने पीपीपी तत्त्वावर उपवन येथे फुटबॉल मैदान विकसित केले जाणार आहे; परंतु ज्या करदात्यांच्या पैशांतून हे मैदान विकसित केले जाणार आहे, त्यांच्यासाठीच दुपारी १२ ते ४ या चुकीच्या वेळेत हे मैदान उपलब्ध असणार आहे. त्यामुळे हा ठाणेकरांवर अन्याय असून यात बदल करण्याची मागणी करत सुधारित प्रस्ताव पटलावर आणण्याची मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी लावून धरली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेवर अखेर हा प्रस्ताव तहकूब करण्याची वेळ आली.

Thane: Corporators kick a football tour! The proposal finally stopped | ठाणे : फुटबॉल टर्फला नगरसेवकांची किक! प्रस्ताव अखेर तहकूब

ठाणे : फुटबॉल टर्फला नगरसेवकांची किक! प्रस्ताव अखेर तहकूब

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने पीपीपी तत्त्वावर उपवन येथे फुटबॉल मैदान विकसित केले जाणार आहे; परंतु ज्या करदात्यांच्या पैशांतून हे मैदान विकसित केले जाणार आहे, त्यांच्यासाठीच दुपारी १२ ते ४ या चुकीच्या वेळेत हे मैदान उपलब्ध असणार आहे. त्यामुळे हा ठाणेकरांवर अन्याय असून यात बदल करण्याची मागणी करत सुधारित प्रस्ताव पटलावर आणण्याची मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी लावून धरली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेवर अखेर हा प्रस्ताव तहकूब करण्याची वेळ आली.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत क्रिकेट, अ‍ॅथलेटिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, रायफल शूटिंग, स्केटिंग आदींकरिता अद्ययावत क्रीडासंकुले महापालिकेने उपलब्ध करून दिली आहेत. फुटबॉल हा खेळ जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा खेळ म्हणून ओळखला जातो. दिवसेंदिवस फुटबॉलच्या खेळासाठी मैदानाची मागणी नागरिकांकडून व पदाधिकाºयांकडून केली जात आहे. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने फुटबॉल खेळासाठी अत्याधुनिक पद्धतीचे मैदान विकसित करण्याचे निश्चित केले आहे.
गावंडबाग येथील मैदान हे आॅलिम्पिक आकाराचे आहे. या मैदानात फुटबॉलकरिता आॅलिम्पिक दर्जाचे टर्फ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातूनही आंतरराष्टÑीय दर्जाचे फुटबॉल खेळाडू तयार होऊ शकतात, असा विश्वास ठाणे महापालिकेला वाटत आहे. त्यानुसार, ६ हजार चौ. फुटांवर हे टर्फ अंथरले जाणार आहे.
पीपीपी तत्त्वावर २० वर्षांच्या कालावधीसाठी ८०-२० टक्केवारीत हे मैदान विकसित केले जाणार असून खाजगी संस्थेत चालवण्यासाठी दिले जाणार आहे. त्यानुसार, फुटबॉलसाठी ११,२४७.३४१ चौ. मीटरचे मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खाजगी संस्थेकडून आर्टीफिशिअल टर्फ उपलब्ध खेळाच्या जागेत विविध खेळांकरिता बसवण्यात येणार असून छोट्या मुलांसाठी प्ले पार्क आणि जनरल जिम, खेळांच्या मैदानाभोवती चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, बास्केटबॉल कोर्ट, क्रिकेटच्या नेट सरावाकरिता नेट उपलब्ध करून देणे, फूड कोर्ट, स्पर्धा पाहण्यासाठी बैठक व्यवस्था, ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सर्व स्पर्धा व इतर स्पर्धा घेणे, खेळाडूंना मोफत बॉल, बिब्सचा पुरवठा करणे आदी सुविधा संबंधित संस्थेला कराव्या लागणार आहेत.
दरम्यान, शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. परंतु, करदात्या ठाणेकरांना दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेतच हे मैदान उपलब्ध करून दिले जाणार असून उर्वरित वेळेस मात्र संस्थेमार्फत हे मैदान भाड्याने दिले जाणार आहे. भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील आणि दीपा गावंड या दोन्ही नगरसेवकांनी नेमका हाच मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या कारभारावर टीका केली.
ठाणेकरांना दुपारीच मैदान; उर्वरित वेळेत भाड्याने देणार-
करदात्या ठाणेकरांना चुकीच्या वेळेत हे मैदान उपलब्ध होणार असेल, तर महापालिकेनेच हे मैदान विकसित करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यापाठोपाठ भाजपाचे अन्य नगरसेवकही या मुद्यावरून आक्र मक झाले आणि हा प्रस्ताव तहकूब करण्याची मागणी केली.
शहरातील खेळाडूंना फुटबॉलचे मैदान उपलब्ध होणार असल्याचा दावा करत शिवसेनेचे नगरसेवक मात्र या प्रस्तावासाठी आग्रही होते. अखेर, फुटबॉल मैदानाचा सुधारित प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले.
शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. परंतु, करदात्या ठाणेकरांना दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेतच हे मैदान उपलब्ध करून दिले जाणार असून उर्वरित वेळेस मात्र संस्थेमार्फत हे मैदान भाड्याने दिले जाणार आहे. भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील आणि दीपा गावंड या दोन्ही नगरसेवकांनी नेमका हाच मुद्दा उपस्थित केला.

Web Title: Thane: Corporators kick a football tour! The proposal finally stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.