Thane: पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना टोला
By अजित मांडके | Published: April 15, 2024 02:28 PM2024-04-15T14:28:52+5:302024-04-15T14:29:21+5:30
Lok Sabha Election 2024: संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचे की रडायचे हेच समजत नाही.पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहे. असा टोला शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना लगावला.
- अजित मांडके
ठाणे - संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचे की रडायचे हेच समजत नाही. पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहे. असा टोला शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना लगावला. संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यामाध्यमातून 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चोकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. त्यावर श्रीकांत शिंदेनी बोलतांना हा टोला लगावला.
संजय राऊत यांनी काय पत्र पाठवले ते मी वाचले नाही. मात्र आमच्या फाउंडेशनची इत्यंभूत माहिती त्यांनी ठेवली आहे.राऊत यांना शिव्या शाप शिवाय दुसरे सुचत नाही. अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र दिले त्यांचा विश्वास पंतप्रधान यांच्यावरती वाढला आहे. हे यावरून दिसून येत आहे. असे शिंदे म्हणाले.पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जे जेल मध्ये जाऊन आलेले आहे. तेच पत्र लिहीत आहेत. तसेच खिचडी घोटाळा आरोपी कुटुंबीयांच्या खात्यात पैसे आले.असे शिंदे म्हणाले.तुम्ही आजपर्यंत कोणाला मदत केली आहे का? असा सवाल शिंदे यांनी विचारला. तसेच पत्रके घर मे रहने वाले दुसरे को पत्र लिखा नही करते. असा टोलाही शिंदे यांनी राऊत यांना लगावला.राऊत यांनी पंतप्रधान यांना पाठवलेल्या पत्रामधील तपशील मोघम आहे. असे म्हणत आज कोणतीच गोष्ट माहितीच्या अधिकारा मध्ये लपत नाही.असे सांगत काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशी टीका शिंदे यांनी केली.त्यांच्यासाठी चांगला डॉक्टर बघा त्याची देखील मदत वैद्यकीय कक्ष घ्यायला तयार आहे.त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च वैद्यकीय कक्ष करेल. असे शिंदे यांनी सांगितले