Thane: गुंतवणुकदारांची फसवणूक प्रकरणी एमपीआयडीच्या गुन्ह्यातून दाम्पत्याची निर्दोष मुक्तता
By जितेंद्र कालेकर | Published: January 2, 2023 10:55 PM2023-01-02T22:55:54+5:302023-01-02T22:56:42+5:30
Thane: गंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने सचिन विचारे आणि रश्मी विचारे या दाम्पत्याची शनिवारी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीने गुन्हा ना कबूल केल्यानंतर सबळ पुराव्याअभावी आरोपींची विशेष न्यायाधीश पी. एस. विठलानी यांनी ही निर्दोष मुक्तता केली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - गंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणेन्यायालयाने सचिन विचारे आणि रश्मी विचारे या दाम्पत्याची शनिवारी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीने गुन्हा ना कबूल केल्यानंतर सबळ पुराव्याअभावी आरोपींची विशेष न्यायाधीश पी. एस. विठलानी यांनी ही निर्दोष मुक्तता केली.
गुंतवणूकदारांनी वाहने विकत घ्यायची. हीच वाहने भाडयाने लावून देण्याचे अमिष दाखवून त्यांना १४० टक्के व्याजाचा परतावा देण्याचे अमिषही जेएम फ्राईटच्या सचिन आणि रश्मी विचारे या संचालकांनी दाखविल्याचा आरोप होता. यात दोन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी जुलै २००९ मध्ये नौपाडा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एमपीआयडीचा गुन्हा दाखल झाला होता. नंतर हे प्रकरण ठाणे गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाले होते. परंतू, कथित आरोपींनी संबंधित गुंतवणूकदारांचे पैसे हे ठरल्याप्रमाणे परतावा केला असून कोणत्याही प्रकारे फसवणूकीचा गुन्हाच केला नसल्याचा दावा आरोपीचे वकील मकरंद अभ्यंकर यांनी आपला युक्तीवाद करतांना केला. यावेळी सरकारी वकील म्हणून विवेक कडू यांनी गुंतवणूकदारांची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. शिवाय, पोलिसांनी जप्त केलेल्या सहा बसेसच्या लिलावातून आलेल्या २९ लाख ४० हजारांच्या रोकडचे समान वितरण करावे. त्यातून ठाणे उपविभागीय अधिकाºयांमार्फत गुंतवणूकदारांना त्यांचा उर्वरित परतावा दिला जावा, असेही आदेशात न्यायालयाने म्हटले आहे.