केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला, कोर्टानं आजही जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:54 PM2022-05-26T18:54:19+5:302022-05-26T18:54:51+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

thane court rejects bail application of ketaki chitale | केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला, कोर्टानं आजही जामीन अर्ज फेटाळला

केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला, कोर्टानं आजही जामीन अर्ज फेटाळला

googlenewsNext

ठाणे-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. कारण आजही कोर्टानं तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात केतकीच्या वकिलांकडून जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावरील सुनावणीत न्यायाधीशांनी हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने जामीन देण्यात येऊ शकत नाही असे मत नोंदवले आहे. 

दुसरीकडे रबाळे पोलीस स्टेशनअंतर्गत अॅट्रोसिटी प्रकरणातील जामीनाबाबत अद्याप पोलिसांचा जबाब येणे आहे बाकी त्यामुळे केतकी हीचा तुरुंगातील मुक्काम आता आणखी वाढला आहे. 

अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात रबाळे पोलिसांच्या ताब्यात असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. केतकी हिच्याविरुद्ध कोरोनाच्या कालावधीत २०२० मध्ये अँट्रॉसिटीचा गुन्हा नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आठ महिन्यांपूर्वी तिने ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. हा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी केतकीला १९ मे रोजी ठाणे न्यायालयातून ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्यात केतकीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

Web Title: thane court rejects bail application of ketaki chitale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.