ठाण्यात कोविड रुग्णांना उपलब्ध खाटांची माहिती मिळणार एकाच डॅशबोर्डवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:17 PM2020-05-31T23:17:13+5:302020-05-31T23:21:42+5:30

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अशा रुग्णाना अनेक रुग्णालयांमध्ये दाखल होण्यात अनेक अडचणी येत होत्या. या पाशर््वभूमीवर ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त सिंघल यांच्याकडे रु ग्णालयातील खाटांबाबत माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करीत उपलब्ध खाटांची माहिती एकाच डॅशबोर्डवर देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

 In Thane, Covid patients will get information about available beds on a single dashboard | ठाण्यात कोविड रुग्णांना उपलब्ध खाटांची माहिती मिळणार एकाच डॅशबोर्डवर

कोविडचे निदान झालेल्या रुग्णांसह नातेवाईकांना मोठा दिलासा

Next
ठळक मुद्देआमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीला यशकोविडचे निदान झालेल्या रुग्णांसह नातेवाईकांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज़ नेटवर्क
ठाणे : कोविड चे निदान झालेल्या रु ग्णांच्या नातेवाईकांना आता ठाण्यातील
रु ग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे. ठाण्यातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीनंतर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी हा विशेष डॅशबोर्ड मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सुरू केला आहे. त्यामुळे अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे शहरातील विविध भागात कोविडचे रु ग्ण मोठया प्रमाणात आढळत आहेत. महापालिकेने ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालयाबरोबरच विविध खासगी
रु ग्णालये अशा रु ग्णांसाठी अधिग्रहित केली आहेत. तर अनेक रु ग्णालयांमध्ये कोविडच्या रु ग्णांना दाखल केले जात नाही. त्यामुळे विशिष्ट रु ग्णालयातील उपलब्ध खाटांबाबत रु ग्ण आणि रु ग्णांच्या नातेवाईकांना माहिती उपलब्ध होत नव्हती. काही वेळा रु ग्ण त्याठिकाणी गेल्यानंतर जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे कोविडच्या रुग्णांना अन्य रु ग्णालयात जावे लागत असल्याने संसर्गाचीही भीती होती. या पाशर््वभूमीवर आमदार डावखरे यांनी महापालिका आयुक्त सिंघल यांच्याकडे रु ग्णालयातील खाटांबाबत माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेनेही मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ही डॅशबोर्डची सेवा सुरू केली. ठाणे शहरातील नागरिकांना www.covidbedthane.in या वेबसाईटवर डॅशबोर्ड उपलब्ध होणार आहे. त्यावरु न रु ग्णांच्या नातेवाईकांनी माहिती घ्यावी, असे आवाहनही महापालिकेसह आमदार डावखरे यांनी केले आहे.

Web Title:  In Thane, Covid patients will get information about available beds on a single dashboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.