ठाणे गुन्हे शाखेने डायघर येथून केली गांजाच्या तस्कराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 08:38 PM2019-10-08T20:38:59+5:302019-10-08T20:52:15+5:30
मुंब्रा कौसा पासून जवळच असलेल्या डायघर परिसरातील एका हॉटेलसमोर गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या अभिषेक भोसले याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून सहा किलो गांजाही जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: डायघर येथील कल्याण चौक भागात गांजाची तस्करीसाठी आलेल्या अभिषेक भोसले (२०, रा. मानपाडा, कल्याण) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून ७२ हजारांचा सहा किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
मुंब्रा पनवेल रोडवरील कल्याण चौक येथील सुनिल बार अॅन्ड रेस्टॉरन्टच्या समोर २० ते ३० वयोगटातील दोघेजण गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, समीर अहिरराव, उपनिरीक्षक अशोक माने, कैलास सोनवणे आणि दत्तात्रय सरक आदींच्या पथकाने डायघर भागात सापळा रचून अभिषेक भोसले (रा. भोसलेवाडी,
अभिषेक भोसले (२०, रा. मानपाडा, कल्याण) याला गांजा विक्री प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने ५ आॅक्टोंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शीळ डायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सखोल चौकशीअंती ६ आॅक्टोंबर रोजी अटक करण्यात आली असून ठाणे न्यायालयाने त्याला ९ आॅक्टोंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक अशोक माने याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.