ठाणे : गांधीनगर परिसरात सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 01:42 PM2018-02-26T13:42:44+5:302018-02-26T13:42:44+5:30

सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत 10 झोपड्या जाळून खाक झाल्याची घटना भीमनगर येथील गांधीनगर परिसरात घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

Thane: cylinder blast in Gandhinagar area | ठाणे : गांधीनगर परिसरात सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग 

ठाणे : गांधीनगर परिसरात सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग 

googlenewsNext

ठाणे - सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत 10 झोपड्या जाळून खाक झाल्याची घटना भीमनगर येथील गांधीनगर परिसरात घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ही संपूर्ण झोपडपट्टी अनधिकृत आहे. सोमवारी (26 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. परिसरात  दीड हजारांपेक्षा अधिक झोपड्या आहेत. सुदैवानं वेळेतच आग विझवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. 

कशी लागली आग?

गांधीनगर परिसरातील एका घरामध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर शेजारील घरात असलेल्या तीन सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली. आग लागण्याच्या घटना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला समजल्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे 4 बंब, एक रेस्क्यू वाहन आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहोचले. अवघ्या दीड तासांमध्ये अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग विझवली. अग्निशमन विभागाचा बंब झोपडपट्टीमध्ये येऊ शकत नसल्याने विरोधी दिशेने बंब उभा करून पाईपलाईनवरून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले गेले. यावेळी घटना स्थळी पोलीस, महावितरणचे अधिकारी आणि आणि गॅस डीलरचे कर्मचारीदेखील पोहोचले होते. आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं केवळ 10 झोपड्या जळून खाक झाल्या व सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

Web Title: Thane: cylinder blast in Gandhinagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.