Thane: उल्हासनगरात ऑर्केस्ट्रा व अँपल बारच्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई, इतर बारची तपासणी
By सदानंद नाईक | Published: June 27, 2024 07:36 PM2024-06-27T19:36:35+5:302024-06-27T19:39:34+5:30
Thane News: पुणे पोलिसांच्या धर्तीवर शहरातील अँपल व ऑर्केस्ट्रा बारच्या अवैध बांधकामावर महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरवारी दुपारी पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केली. तसेच इतर बारच्या अवैध बांधकामाची चौकशी करण्यात येत असल्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - पुणे पोलिसांच्या धर्तीवर शहरातील अँपल व ऑर्केस्ट्रा बारच्या अवैध बांधकामावर महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरवारी दुपारी पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केली. तसेच इतर बारच्या अवैध बांधकामाची चौकशी करण्यात येत असल्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
उल्हासनगरात पुणे पोलिसांचा कित्ता गिरविण्यात आले आहे. ऑर्केस्ट्रा व अँपल बारचे बेकायदेशिर बांधकामावर कारवाई करणेसाठी पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांना लेखी पत्र दिले होते. आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी ऑर्केस्ट्रा व अँपल बारच्या बेकायदेशिर बांधकामावर गुरवारी दुपारी पोलीस संरक्षणात पाडकाम करण्यात आली. शहरातील इतर बारमालकांना देखिल नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. सदर बारमालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरु असून पडताळणीअंती जे बार बेकायदेशिर आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी सर्वसहायक आयुक्त यांना आदेश दिले आहे. आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेने बार चालकांची धाबे दणाणले आहे.