Thane: उल्हासनगरात गॅलरी पडलेल्या द्वारकाधाम इमारत पाडकाम कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 03:59 PM2023-07-21T15:59:55+5:302023-07-21T16:00:36+5:30

Ulhasnagar : कॅम्प नं-३, राधाबाई चौक द्वारका धाम इमारतीची गॅलरी गुरवारी रात्री पडल्यानंतर, महापालिकेने इमारती मधील दोन कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवून शील केली होती.

Thane: Demolition operation of Dwarkadham building with gallery in Ulhasnagar | Thane: उल्हासनगरात गॅलरी पडलेल्या द्वारकाधाम इमारत पाडकाम कारवाई

Thane: उल्हासनगरात गॅलरी पडलेल्या द्वारकाधाम इमारत पाडकाम कारवाई

googlenewsNext

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : कॅम्प नं-३, राधाबाई चौक द्वारका धाम इमारतीची गॅलरी गुरवारी रात्री पडल्यानंतर, महापालिकेने इमारती मधील दोन कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवून शील केली होती. सावधगिरीचा उपाय शनिवारी इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-३ ,दसरा मैदान शेजारील पाच मजली इमारतीच्या ए व बी विंग मध्ये एकून ६६ प्लॉट आहेत. दरम्यान महापालिकेने द्वारका धाम इमारत धोकादायक घोषित करून प्लॉटधारकांना इमारत खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. बहुतांश नागरिकांनी इमारत खाली करून २ ते ३ कुटुंब इमारती मध्ये राहत होते. गुरवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान इमारतीच्या गॅलऱ्या पडल्या. त्यातीक एक गॅलरी शेजारील विधुत खांबावर पडल्याने, स्फोट होऊन परिसराचा विधुत पुरवठा खंडित झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इमारतीच्या गॅलऱ्या पडल्याची माहिती आयुक्त अजिज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच त्यांनी घटनेचा आढावा घेऊन, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाला घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्यासह अग्निशमन विभाग प्रमुख बाळू नेटके, सहायक आयुक्त गणेश शिंपीघटनास्थळी पोहचले. इमारत धोकादायक झाल्याने, इमारतीच्या आजूबाजूचा परिसर अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी निर्मनुष्य करून रस्त्यावरची वाहतूक बंद केली. तसेच इमारतीला सील करून शुक्रवारी इमारतीवर पाडकाम कारवाई करण्याचे संकेत दिले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पासून इमारत पाडकामाला सुरवात केली आहे.

Web Title: Thane: Demolition operation of Dwarkadham building with gallery in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.