ठाणे - पालघर जिल्ह्यातील २९ ४५६ शेतकऱ्यांच्या खात्याात ९४ कोटी ८७ लाखाच्या कर्जमाफीची रक्कम जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 09:44 PM2017-12-12T21:44:42+5:302017-12-12T21:44:47+5:30
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेबाबत मागील काही महिन्यांंपासून सुरू असलेले आरोप, प्रत्यारोप आता संपले आहे. या योजनेखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ४५६ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांचे ९३ कोटी ८६ लाख ७७ हजार २५५ व प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या कर्जमाफीची रक्कम हातात पडताच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले आज असल्याचा दावा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ८९७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४४ कोटी ३६ लाख २६ हजार १३१ इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांपैकी सात हजार ६४१ थकबाकीदार शेतकºयांना ३२ कोटी ९९ लाख ४९ हजार ३०१ रु पये तर सात हजार २५६ खातेदारांना ११ कोटी ३६ लाख ७६ हजार ८२९ कोटी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील १४ हजार ५५९ खातदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४९ कोटी ५० लाखा ५१ हजार १२३ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यापैकी आठ हजार ६६८ थकबाकीदार खातेदारांना ३९ कोटी ७७ लाख दोन हजार ८८६ रूपये कर्जमाफी तर पाच हजार ८९१ खातेदारांना नऊ कोटी ७३ लाख ४८ हजार २५५ रूपये प्रोत्साहनपर प्राप्त झाले आहेत.
योजने अंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च या कालावधीत वाटप कर्जास कर्जमाफी मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतक ºयांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रु पयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली . या योजनेंतर्गत ७७ लाख अर्ज प्राप्त. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करु न ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रु पये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक हजार ६७५ खातेदार व पालघरमधील एक हजार ४४२ आदी तीन हजार ११७ खातेदार कर्ज सवलतीचा लाभ मिळण्यास पात्र आहेत. या शेतकºयांकडील दीड लाखांवरील थकबाकी ३१ मार्चपर्यंत भरून कर्ज सवलतीचा लाभ त्वरीत घेण्याचे आवाहन टीडीसीसी बँकेने केले आहे.