ठाण्यात १५० विद्यार्थ्यांकडून कोटयवधींचे शुल्क उकळून संचालक गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 11:27 PM2020-12-07T23:27:53+5:302020-12-07T23:34:26+5:30
आकर्षक जाहिराती करून १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी लाखो रु पयांचे शुल्क घेऊन ‘राव आयआयटी अकॅडमी’ आणि ‘राव ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स महाविद्यालयाच्या अकादमीच्या संचालकाने संस्थेला टाळे ठोकले आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून मनसेने याप्रकरणाच्या चौकशीची मागणी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आयआयटीत प्रवेश, विज्ञान शाखेतून घवघवीत यश आणि यशाची हमखास संधी अशा आकर्षक जाहिराती करून १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी लाखो रु पयांचे कोटयवधींचे शुल्क घेऊन ‘राव आयआयटी अकॅडमी’ आणि ‘राव ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स महाविद्यालयाच्या अकादमीच्या संचालकाने संस्थेला टाळे ठोकले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नविनर्माण सेनेने ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे.
ठाण्यात राहणाऱ्या अमृत देसाई यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी २०१९ मध्ये नौपाडा येथील राव आयआयटी अकादमी व राव ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स येथे तीन लाख रूपये भरुन प्रवेश घेतला. या शिक्षण संस्थेमध्ये सुमारे १०० ते १५० विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, या सर्व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा संशय असून संस्थेचे संचालक पांडे पालकांना भेटून त्यांच्या समस्या दूर करण्यास तयार नसल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. संस्थेच्या गोंधळात काही मुलांचे शैक्षणिक वर्ष देखील वाया गेले. त्यामुळे किमान फीसाठी भरलेली आर्थिक रक्कम तरी परत मिळावी, यासाठी पालकांनी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे गाºहाणे मांडले. पाचंगे यांनी पालकांच्या समस्या जाणून घेत याप्रकरणी थेट ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्र ार केली. या तक्र ारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित पालकांचे जबाब नोंदविले असून लवकरच अकादमीचे संचालक पांडे यांनाही गुन्हे शाखेकडे चौकशीला पाचारण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘‘कोरोना काळात लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या पालकांवर आधीच आर्थिक संकट कोसळले आहे. पालकांना फीमध्ये सवलत देण्याऐवजी अकादमीचे संचालक संस्थेचा गाशा गुंडाळून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडत आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’’
संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, ठाणे
‘‘ यामध्ये किती तथ्यता आहे. ते तपासावे लागेल. या अकादमीने किती शुल्क घेतले. याचीही पडताळणी सुरु आहे.’’
सरदार पाटील, सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर