ठाणे जि. प.च्या ३६३ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी; १० जणांची पदोन्नती तर ४४ जणांचे पुनर्विलोकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:11 PM2020-02-14T19:11:44+5:302020-02-14T19:19:04+5:30
प्रत्येक कर्मचाऱ्यांला त्याच्या सेवेनुसार शासनाचे असणारे लाभ मिळणे गरजेचे असतात. मग ती वेतनश्रेणी वाढ असेल, पदोन्नती किंवा इतर लाभ असले तरी त्याचा कर्मचाऱ्यांला हे लाभ विहीत वेळेत मिळणे देखिल महत्वाचे असतात. त्यामुळे शासनाच्या निर्णयाची,धोरणाची अंमलबावणी करून हे लाभ दिले आहेत. - - हिरालाल सोनवणे सीईओ- जिल्हा परिषद ठाणे
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या (जि.प.) प्रशासन आणि वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांना करून देण्यात आला. तर पदोन्नती दहा जणांची करण्यात आली. याशिवाय ३० वर्षे सेवा झालेल्या ४४ कर्मचाऱ्यांचे वैयक्तीक माहितीचा लेखाजोखा तपासण्यासाठी त्याचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश जि.प.ने जारी केले आहे.
जि.प.ला सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवा पुनिर्वलोकन आणि वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ दिला जात आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ वेळीच प्राप्त करून देण्यासाठी जि.प.चे अध्यक्षा दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार विशेष लक्ष देऊन त्यांना त्याच्या सेवेस अनुसरून लाभ देण्याचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. वाय. जाधव यांनी दिली. शासनाच्या २ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयाची अमलबजावणी करीत कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ करून देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लाभ मिळालेल्यांमध्ये सामान्य प्रशासन विभागातील वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षे, २० आणि ३० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या ३६३ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे. आश्वासित प्रगती योजनेव्दारे या वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे. तर वित्त विभागातील ४० कर्मचाऱ्यांना ही वेतनश्रेणी लाभ देण्यात आला आहे. या लाभामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत वाढ होणार आहे. तर प्रशासन विभागातील सहा कर्मचाऱ्यांना प्रत्येक्ष पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना या प्रत्येक्ष पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. या व्यतिरिक्त सेवानिवृत्त झालेल्या सहा कर्मचाऱ्यांना १२ आणि २४ वर्षे सेवेचा लाभ देखिल देण्यात आला आहे. या शिवाय ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५४ वर्षे किंवा ज्यांची सेवा ३० वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पुनर्विलोकन शासनाच्या धोरणास अनुसरून केले जात आहे. यात प्रशासनातील २७ आणि वित्त विभागातील १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
...............
कोट -