CoronaVirus अबब! ठाणे जिल्हा १० हजार पार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:32 AM2020-06-06T05:32:39+5:302020-06-06T06:14:11+5:30
एका दिवसात आढळले कोरोनाचे ४४५ रुग्ण : १८ जणांचा मृत्यू, एकूण मृत्यूसंख्या ३४२
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४४५ बाधित रुग्णांच्या नोंदीसह १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १० हजार ४१९ झाला असून मृतांची संख्या ३४२ इतकी झाली आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
शुक्रवारी ठाणे महापालिका क्षेत्रात १५२ कोरोना बाधीतांच्या नोंदीसह पाच जणांच्या मृत्यू झाल्याने बाधितांचा आकडा तीन हजार ७९५ तर मृतांचा आकडा ११३ वर पोहोचला. नवी मुंबई महापालिकेत ८६ नव्या रुग्णासह ४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधीतांचा आकडा २ हजार ६४३ तर मृतांचा ८ वर पोहोचला आहे.
कल्याण डोंबिवलीत ५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीतांचा आकडा एक हजार ३२७ इतका झाला. मीरा-भार्इंदरमध्ये ४६ रुग्णांच्या नोंदीसह ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ९०३ तर मृतांचा ४८ वर गेला आहे. भिवंडीमध्ये २० रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांचा आकडा २३५ झाला आहे. येथे दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची संख्या १३ वर गेली आहे.
बदलापूरमध्ये सात; तर अंबरनाथमध्ये १७ रुग्ण
च्उल्हानगरमध्ये ४० रुग्णांसह एका मृत्यूची नोंद झाली असून बाधीतांचा आकडा ४८१ तर मृतांचा २० झाला. बदलापूरमध्ये सात रुग्णांची नोंद झाली आहे. येथे बाधितांचा आकडा २७३ तर मृतांचा आठ झाला आहे. तर, अंबरनाथमध्ये १७ रुग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा ३०४ वर गेला.
च्ठाणे ग्रामीण भागात २५ रुग्णांसह दोन मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा ४५८ तर मृतांचा आकडा १२ झाला आहे.