ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९३.६३, निकालात भाईंदर सर्वात पुढे तर सर्वात मागे भिवंडी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: June 2, 2023 03:37 PM2023-06-02T15:37:46+5:302023-06-02T15:37:56+5:30

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. शुक्रवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. 

Thane district 10th result 93.63, Bhayander is first in the result and Bhiwandi is the last | ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९३.६३, निकालात भाईंदर सर्वात पुढे तर सर्वात मागे भिवंडी

ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९३.६३, निकालात भाईंदर सर्वात पुढे तर सर्वात मागे भिवंडी

googlenewsNext

ठाणे : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ अर्थात दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के लागला. बारावी प्रमाणे दहावीच्या शालांत परिक्षेतही मुलींनीच बाजी मारल्याची स्पष्ट झाले आहे. या परिक्षेत मुलांचा निकाल ९१.९८ तर मुलींचा निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. 

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. शुक्रवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. 

दुपारी १२ वाजल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने हा निकाल लागला. काही वेळातच हा निकाल पाहताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. ठाणे जिल्ह्यात ११ तालुके असून या तालुक्यांचा एकूण निकाल ९३.६३ टक्के लागला आहे. यात भाईंदर महापालिकेचा सर्वाधीक तर यंदा या निकालात भिवंडी सर्वात मागे असल्याचे दिसून येत आहे. या परिक्षेला एकूण ११११८२ मुले बसली होती पैकी १,०४,१०२ मुले उत्तीर्ण झाली आहेत.

Web Title: Thane district 10th result 93.63, Bhayander is first in the result and Bhiwandi is the last

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.