ठाणे जिल्ह्यात शनिवारी 1822 नवीन रुग्ण वाढले, तर 43 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 08:40 PM2020-07-18T20:40:59+5:302020-07-18T20:42:36+5:30

जिल्ह्यात शनिवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 475 नवीन रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

In Thane district, 1822 new cases were reported on Saturday, while 43 people died | ठाणे जिल्ह्यात शनिवारी 1822 नवीन रुग्ण वाढले, तर 43 जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात शनिवारी 1822 नवीन रुग्ण वाढले, तर 43 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात शनिवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 475 नवीन रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ठाणे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना दिसून येत आहे. त्यात गुरुवार, शुक्रवार प्रमाणे शनिवारी देखील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. शनिवारी दिवसभरात 1 हजार 822 नवीन रुग्णांसह 43 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात 65 हजार 927 बधीतांसह एक हजार 870 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात शनिवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 475 नवीन रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 15 हजार 480 तर, मृतांची संख्या 240 वर पोहोचला आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 342  रुग्णांसह 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या 15 हजार 516 तर, मृत्यूची संख्या 567 वर गेली आहे. त्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 352 नव्या रुग्णांसह 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बंधीतांची संख्या 11 हजार410 तर, मृतांची संख्या 340 इतकी झाली आहे. 
    
मीरा भाईंदरमध्ये 168 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 6 हजार 408 झाली आहे.  तर, मृतांची संख्या 219 इतकी झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 57 बधीतांची तर, 2 जणांच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 3 हजार 63 तर, मृतांची संख्या 175 वर पोहोचली आहे. उल्हासनगर 148 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 5 हजार 432 तर, मृतांची संख्या 80 झाली आहे. अंबरनाथमध्ये 64 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 30 तर, मृतांची संख्या 116 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 66 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 833 झाली. तर, ठाणे ग्रामीण भागात 150 रुग्णांची तर, एका जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 27 तर, मृतांची संख्या 107 वर गेली आहे.
 

Web Title: In Thane district, 1822 new cases were reported on Saturday, while 43 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.