CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १९०३ नवे रुग्ण, ४४ जणांचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 01:53 AM2020-09-18T01:53:16+5:302020-09-18T01:54:21+5:30
ठाणे पालिका क्षेत्रात ४०६ नवे रुग्ण सापडल्यामुळे या शहरात ३१ हजार ६७३ रुग्णांची नोंद झाली आहे.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ९०३ नव्या रुग्णांचा शोध गुरुवारी घेण्यात आला आहे. या रुग्णांसह आतापर्यंत एक लाख ५३ हजार १३९ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. तर, ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे पालिका क्षेत्रात ४०६ नवे रुग्ण सापडल्यामुळे या शहरात ३१ हजार ६७३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९१८ झाली आहे. केडीएमसी हद्दीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने ५७२ रुग्ण आढळले. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ४४ रुग्ण नव्याने सापडले असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा-भार्इंदर पालिका परिसरात २२८ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. अंबरनाथमध्ये ५३ तर बदलापूरला ५८ रुग्ण सापडले आहेत.
रायगडमध्ये ७२० नवे कोरोना रुग्ण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी ७२० नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ७८८वर पोचली आहे. दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण १०६८ जणांचा मृत्यू झाला, तर ३२ हजार ४६० रुग्णांनी कोरोनावर मात केली.
वसई-विरारमध्ये २९९ नवे रुग्ण
वसई : वसई-विरार शहरात गुरुवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन बाधित रुग्णसंख्या २९९ ने वाढली आहे. मात्र दिलासादायक म्हणजे दिवसभरात १८१ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत.
नवी मुंबईत ३१२ रुग्ण
नवी मुंबई : शहरात दिवसभरात ३१२ रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णसंख्या ३२००३ झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे. नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत.