ठाणे: जिल्ह्यातील महसूलच्या ४२७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची सपत्निक होणार वैद्यकीय तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 07:51 PM2022-08-01T19:51:03+5:302022-08-01T19:52:24+5:30

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची माहिती

Thane District 427 revenue officers and employees medical check up will be done says Collector | ठाणे: जिल्ह्यातील महसूलच्या ४२७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची सपत्निक होणार वैद्यकीय तपासणी

ठाणे: जिल्ह्यातील महसूलच्या ४२७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची सपत्निक होणार वैद्यकीय तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कामकाजात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून महसूल विभागाने सामान्यांना दिलासा देण्याचे काम करावे. या बरोबर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने ४० वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक केल्याचे सुतोवाच ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४२७ अधिकाऱ्यांची सपत्निक तपासणी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महसुल दिनाचा कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये सोमवारी पार पडला. यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, रेवती गायकर, अर्चना कदम, रोहीत राजपूत आदी उपस्थित होते. अधिकारी कर्मचाऱ्यांना महसुल दिनाच्या शुभेच्छा देत महसुल विभाग काळानुरूप बदलतोय दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करतानाच स्वतासोबतच सामान्यांचे जगणे सुंदर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी व्याख्याते देशमुख यांनी जगणे सुंदर आहे याविषयावर व्याख्यान दिले. निवासी उपजिल्हाधिकारी परदेशी यांनी प्रास्ताविक करताना महसूल दिनाची मुळ संकल्पना विषद केली. यावेळी ठोंबरे यांनी बदलते महसुल प्रशासन याविषयी सादरीकरण केले. महसुल विभागत काळानुरूप झालेले बदल आणि फायदे याबाबत विवेचन केले. उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी आरोग्य तपासणी मोहिमेबाबतची माहिती दिली. महसुल प्रशासनातील ४० वर्षांवरील सुमारे ४२७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ठाण्यातील एका नामवंत हॉस्पीटलच्या सहकायार्तून आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिका यांच्या हस्ते अधिकारी आणि कर्मचा?्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्य तपासणीसाठीचे पत्र देण्यात आले.

यावेळी निवडणूक ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. महसुल दिनानिमित्त जिल्हा पुरवठा अधिकारी राजी थोटे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, राजाराम तवटे, जयराज देशमुख, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह सुमारे ६६ उत्कृष्ट काम करणाºया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Thane District 427 revenue officers and employees medical check up will be done says Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.