ठाणे जिल्ह्यात आठशेवर कोरोनाबाधित, मंगळवारी ७३ नवे रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:07 AM2020-04-29T05:07:03+5:302020-04-29T05:07:18+5:30

मंगळवारी आढळलेल्या नव्या ७३ रुग्णांमध्ये ४१ रुग्ण हे नवी मुंबई येथील आहेत. यामुळे नवी मुंबईतील एकूण रु ग्णांची संख्या १८८ झाली आहे.

In Thane district, 73 new patients were found with 800 coronary arteries | ठाणे जिल्ह्यात आठशेवर कोरोनाबाधित, मंगळवारी ७३ नवे रुग्ण आढळले

ठाणे जिल्ह्यात आठशेवर कोरोनाबाधित, मंगळवारी ७३ नवे रुग्ण आढळले

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ७३ नवे रु ग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबांधीतांची ८०२ वर पोहोचली. मंगळवारी आढळलेल्या नव्या ७३ रुग्णांमध्ये ४१ रुग्ण हे नवी मुंबई येथील आहेत. यामुळे नवी मुंबईतील एकूण रु ग्णांची संख्या १८८ झाली आहे. तर ठामपा क्षेत्रातील रुग्ण २५६ झाले असून मीरा-भार्इंदर १५२ आणि कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात १४३ इतकी आहे.
रविवारी जिल्ह्यात ७१ सोमवारी ३१ रु ग्ण आढळले होते. परंतु, मंगळवारी आढळलेल्या ७३ रुग्णांमुळे जिल्ह्याने ८०० चा आकडा पार केला आहे. मंगळवारी कोणीही दगावले नसल्याने मृत्यूंची संख्या २१ वर स्थिर राहिली आहे. मंगळवारी नवी मुंबईत सर्वाधिक ४१, त्यापाठोपाठ ठामपा १५ , कल्याण डोंबिवली-६, मीरा भाईंदर-५, ठाणे ग्रामीण-३, बदलापूर-२ आणि भिवंडीत १ रु ग्ण सापडले आहेत. अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे मंगळवारी एकही रु ग्ण सापडला नाही.
ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सापडलेल्या १५ पैकी १३ रुग्ण हे पुरुष असून २ महिला आहेत. मंगळवारी ७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांची संख्या ४१ झाली आहे. तर २०६ जणांवर अजून ही उपचार सुरू आहेत. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात आढळून आलेल्या नव्या रु ग्णांमध्ये सहा ही पुरु ष आहेत. यामध्ये एक मुंबईतील वृत्तवाहिनीचा पत्रकार असून दुसरा वाशी एपीएमसीच्या भाजी मंडईतील सुरक्षारक्षक, तर तिसरा मुंबई येथील पोलीस कर्मचारी असून एक रु ग्ण हा बारा वर्षीय मुलगा आहे. या सहा रु ग्णांमुळे तेथील एकूण रु ग्ण संख्या ही १४३ झाली आहे.

Web Title: In Thane district, 73 new patients were found with 800 coronary arteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.