कोरोनात आईवडील दगावलेल्या बालकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:59 PM2021-05-24T19:59:07+5:302021-05-24T19:59:40+5:30
कोरोनामुळे आई-वडील दोन्ही पालकांचा किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या ठाणे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सध्या घ्या सर्वेक्षणानुसार एकूण सात हजार 445 मयत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे आई-वडील दोन्ही पालकांचा किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या ठाणे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सध्या घ्या सर्वेक्षणानुसार एकूण सात हजार 445 मयत आहेत. या कुटुंबाचे सर्वेक्षण करणे व या बालकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधांसह या मुलांना कायदेशीर सेवा पुरवणे, त्यांना मदत करणे, त्यांचे समुपदेशन व पुनर्वसन करणे आदी विषयांवर आज ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समाधानकारक सकारात्मक चर्चा सोमवारी पार पडली.
येथील समिती सभागहात जिल्हाधिकारी तथा या ठाणे जिल्हा कृतीदलाचे अध्यक्ष, यांच्या अध्यक्षतेखाली बालकांची काळजी आणि संरक्षण अंतर्गत कोवीडमुळे आई-वडील हे दोन्ही किंवा एका पालकांचा मृत्यु झाला असल्यास त्यांच्या मुलांकरिता शासन निर्णयानुसार व मार्गदर्शन सुचनेनुसार आज टास्क फोर्सच्या सदस्यांनी जिल्ह्यात बालकांच्या संबधित विविध योजना तसेच करावयाची कार्यवाही तसेच कृती दलातील सदस्यांच्या जबाबदाऱ्या आदीं विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या विषयींवर चर्चा झाली आहे.
यावेळी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे आई-वडील दोन्ही पालकांचा किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्यांमध्ये जिल्ह्यात सात हजार 445 मयत अढळून आले आहेत. या कुटुंबाचे सर्वेक्षण करणे व या बालकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधांसह या मुलांना कायदेशीर सेवा पुरवणे, त्यांना मदत करणे, त्यांचे समुपदेशन व पुनर्वसन करणे आदी विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या या बैठकीत आज समाधानकारक शिक्कामोर्तब झाले, असे ठाणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक रामकृष्ण रेड्डी यांनी लोकमतला सांगितले.