ठाणे जि. प.कडून आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशांचा गुणगौरव
By सुरेश लोखंडे | Published: March 11, 2024 10:27 PM2024-03-11T22:27:47+5:302024-03-11T22:28:01+5:30
नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
ठाणे : जिल्हा परिषदेच्या महिलां बाल विकास विभाग अंतर्गत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आदींनी उत्कृष्ट काम केल्यामुळे त्याचां व गुणवतंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त कर्मचार्यांना शार, श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि दहा हजारांचे पारितोषिक देऊन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्यकार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या हस्ते आज सन्मानीत करण्यात आले.
येथील नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अंगणवाडी सेविका व व मदतनीस या पदांच्या प्रत्येकी आठ जणींना सन्मानित केले. तर चार पर्यवेक्षिका आणि आशा स्वयंसेविकांना उत्कृष्ठ कामगिरीमुळे सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्यांनी कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला या कार्यक्रमादरम्यान १६ जि ल्हा परिषदेचे कर्मचारी व पंचायत समिती कर्मचार्यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.अधिकारी व कर्मचारी यांना एकूण ४२ जणांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. उत्तम कामकाज केल्याबद्दल शहापूर येथील गट विकास आधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी . प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख. संजय बागुल, शिक्षणाधिकारी कुंदा पंडित, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता प्रदिप कुलकर्णी, लघु पाटबंधारेचे दिलीप जोकार, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे आदी उपस्थित उपस्थित होते.