ठाणे जिल्ह्यामध्ये झाला स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:09 AM2018-10-03T05:09:53+5:302018-10-03T05:10:18+5:30

भिवंडीत नगरसेवकांची पाठ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, शहरात जनजागृती रॅली

Thane district became cleaner jagar | ठाणे जिल्ह्यामध्ये झाला स्वच्छतेचा जागर

ठाणे जिल्ह्यामध्ये झाला स्वच्छतेचा जागर

Next

भिवंडी : प्रभूआळी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. मात्र या मोहिमेकडे बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने शहरात स्वच्छता मोहिमेचा फज्जा उडाला. हा कार्यक्रम सर्व नगरसेवकांना कळविला होता. परंतु अनेक काँग्रेस नगरसेवकांसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. महापौर जावेद दळवी, आयुक्त मनोहर हिरे आदी उपस्थित होते. शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली.

स्वच्छता संवाद पदयात्रा सुरू
महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता संवाद पदयात्रेला प्रारंभ झाला. त्याआधी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. पाटील यांच्या हस्ते पदयात्रेचे उद्घाटन झाले. पदयात्रा ३० जानेवारीपर्यंत ग्रामीण भागात जाऊन स्वच्छतेचा संदेश देणार आहे. पाटील यांच्यासह स्वच्छता मोहिमेत आमदार महेश चौघुले, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, श्याम अग्रवाल आदी सहभागी झाले होते.

शहर स्वच्छतेची हाक
उल्हासनगर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छ व सुंदर शहराची हाक देत नेताजी चौक ते पालिका दरम्यान रॅली काढण्यात आली. तसेच शहर काँग्रेसच्यावतीने शास्त्री चौक ते पालिका दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. पालिका कर्मचाºयांनीही जनजागृती फेरी काढली. प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलचा वापर करू नका असा संदेश यावेळी देण्यात आला. नागसेन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून स्वच्छतेची हाक दिली. महापौर पंचम कलानी,आयुक्त गणेश पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

गोंधळींनी दिला संदेश
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्यावतीने शहर स्वच्छतेसाठी कार्य करणाºयांचा आणि या मोहिमेत सहकार्य करणाºयांचा जाहीर सत्कार करण्यात आला. संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात गोंधळींनी स्वच्छतेचा संदेश दिला. अंबरनाथ नगरपालिकेतर्फे सूर्याेदय सभागृहात कार्यक्रम झाला. स्वच्छ प्रभाग स्पर्धेतील विजेत्या प्रभागातील नगरसेवकांचा आणि त्या प्रभागातील स्वच्छतादूतांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छ प्रभागात नगरसेवक सुभाष साळुंखे यांचा प्रथम तर अपर्णा भोईर आणि वीणा उगले यांच्या प्रभागाला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला. पथनाट्यांतून जनजागृती करण्यात आली. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, मुख्याधिकारी देविदास पवार आदी उपस्थित होते.

सामाजिक संस्था,शाळा, विद्यार्थ्यांचा सहभाग
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालिकांबरोबरच सामाजिक संस्था, शाळा, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. शहर स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

१३३ शाळा, महाविद्यालयांचा सहभाग
मीरा रोड : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मीरा-भार्इंदरमध्ये महापालिकेसह विविध शाळा, संस्था यांच्यातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरात प्रभातफेरी काढण्यात आली. १३३ शाळा व महाविद्यालयांचे सुमारे २६ हजार विद्यार्थी अभियानात सहभागी झाले होते. पालिकेने प्लॅस्टिक पिशव्या वापरणाºयांकडून ४२ हजारांचा दंड वसूल करत ३०० किलो प्लॅस्टिक जप्त केले. महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त बालाजी खतगावकर, सभागृह नेते रोहिदास पाटील आदींनी स्वच्छतेची शपथ घेतली. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता आठवड्यातून दोन तास व वर्षात १०० तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचा सर्वांनी निश्चय केला. भार्इंदरच्या नेहरूनगर झोपडपट्टीत विद्यार्थ्यांनी श्रमदान केले अशी माहिती उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली. माजी महापौर गीता जैन यांच्या अस्त्र फाउंडेशनच्यावतीने उत्तन समुद्र किनारा व न्यू म्हाडा वसाहत येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

Web Title: Thane district became cleaner jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.