ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५० कोटींचा ढोबळ नफा; ८४९ कोटींच्या खेळत्या भांडवलात वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 06:57 PM2019-04-10T18:57:54+5:302019-04-10T19:06:13+5:30
बँकेने मागील वर्षी १०९ कोटी ९० लाख रूपये ढोबळ नफा मिळवला होता. यंदा हा नफा १५९कोटी ८५ लाख रूपये झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात ४९ कोटी ९४ लाख ७७ हजार रूपयांची भरघोस वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर आठ हजार ३१५ कोटी १३ लाख रूपयांचे खेळते भांडवल मिळवत त्यात मागील वर्षांपेक्षा ८४८ कोटी ९५ लाख ३२ हजार रूपयांच्या भांडवलात वाढ केली आहे. बँकेने यंदा ठेविंमध्ये ७१६ कोटी तीन लाख रूपयांची वाढ केली
ठाणे : यंदाही नाबार्डकडून ‘अ’ वर्ग प्राप्तीचा दर्जा मिळवणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने ही २४ वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. या बँकेने मार्च अखेर ४९ कोटी ९५ लाख रूपयांचा ढोबळ नफा मिळवत खेळत्या भांडवलामध्ये वर्षभरात ८४८ कोटी ९५ लाख रूपयांची भरघोस वाढ केली, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे आणि सीईओ भगीरथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बँकेने मागील वर्षी १०९ कोटी ९० लाख रूपये ढोबळ नफा मिळवला होता. यंदा हा नफा १५९ कोटी ८५ लाख रूपये झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात ४९ कोटी ९४ लाख ७७ हजार रूपयांची भरघोस वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर आठ हजार ३१५ कोटी १३ लाख रूपयांचे खेळते भांडवल मिळवत त्यात मागील वर्षांपेक्षा ८४८ कोटी ९५ लाख ३२ हजार रूपयांच्या भांडवलात वाढ केली आहे. बँकेने यंदा ठेविंमध्ये ७१६ कोटी तीन लाख रूपयांची वाढ केली आहे. सहा हजार ९७८ कोटी १६ लाख रूपये ठेवी मार्च अखेर निश्चित झाल्या आहेत. मागील वर्षी सुमारे सहा हजार २६२ कोटी १३ लाखांच्या ठेवी होत्या. याशिवाय स्वनिधीमध्ये देखील ४१ कोटी १८ लाखांची वाढ केली आहे. मागील वर्षी ९१२ कोटी ९३ लाखांचा स्वनिधी होता. तो आता ९५४ कोटी ११ लाख रूपये झाला आहे. यामुळे बँकेचा एकूण निधी एक हजार ३७ कोटी ३५ लाख ७३ हजार रूपये झाला आहे. या निधीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ८९ कोटी पाच लाखांची वाढ झाली आहे.
बँकेचे शेअर एक कोटी ९८ लाखांनी वाढले आहेत. ते ४१ कोटी पाच लाख होते. बँकेने तीन हजार १३ कोटी २८ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्ज वाटपात मागील वर्षापेक्षा ९८७ कोटी ४६ लाखांची वाढ केली आहे. थकबाकीमध्ये देखील बँकेने ३.३० टक्के घट केली आहे. गेल्यावर्षी २९२ कोटी एक लाखांची थकबाकी वसूली केली होती. ती यंदा ३३४ कोटी ७३ लाख ८७ हजार वसूल झाले आहेत. म्हणजे मागील वर्षापेक्षा ४२ कोटी ७२ लाख ४७ हजार रूपयांची जास्त थकबाकी वसूल करण्यात आली आहे. याशिवाय बँकेचा सीडीरेशो देखील १०.८३ टक्केने वाढला आहे. वर्षभरात बँकेच्या ठिकठिकाणी दोन शाखा नव्याने सुरू केल्या आहे. यामुळे टीडीसीसीच्या आता ११३ शाखा सुरू आहेत. या बँक शाळांमध्ये २९ हजार ४३५ कर्जदारांची वाढ झाली आहे. तर ८८ हजार ४६० ठेविदारांच्या संख्येतही भरीव वाढ केल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला. सामाजिक बांधिलकीचे भान राखून विविध समाजिक विकासाच्या योजना बँकेने हाती घेतल्या आहेत. मात्र आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून योजना उघड करण्यात बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाने नकार दिला आहे.