पूरग्रस्तांसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन ट्रक घरोपयोगी- शैक्षणिक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 07:49 PM2019-08-29T19:49:07+5:302019-08-29T19:53:47+5:30
या पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यात धरणे भरले, नद्या दुधडी भरून वाहू लागल्यामुळे पूर संकट ओढावले आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्वस्त झाले, शेतकऱ्यांची शेती नष्ठ झाली. जनावरे दगावली आहेत. या महापुराच्या संकटातून सावरण्यासाठी व तेथील नागरीकांना मदतीचा हात देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून मदत साहित्य गुरूवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वाटपासाठी आज रवाना केले.
ठाणे : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन नैसर्गिक संकट ओढावले आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधलकी जपत, येथील तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तर, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीचे १५ टन पशू खाद्य आणि घरगुती वापरासाठी उपयुक्त ठरणारे साहित्याचे दोन ट्रक घेऊनत जात असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
या पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यात धरणे भरले, नद्या दुधडी भरून वाहू लागल्यामुळे पूर संकट ओढावले आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्वस्त झाले, शेतकऱ्यांची शेती नष्ठ झाली. जनावरे दगावली आहेत. या महापुराच्या संकटातून सावरण्यासाठी व तेथील नागरीकांना मदतीचा हात देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून मदत साहित्य गुरूवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वाटपासाठी आज रवाना केले. एवढेच नव्हे बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळ, मुख्यकार्यकारी अधिकारी आदी देखील या साहित्य वाटपासाठी कोल्हापूर व सांगलीला गेले आहेत.
सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी, धनगांव, भिलवडी व अंकलखोप या पूरग्रस्त भागातील तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तर, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी १५ टन पशूखाद्याचे वाटप स्वत: टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, संचालिका दिनकर मॅडम, रेखा पष्टे यांच्यासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर आदी संचालक व अधिकारी साहित्य वाटप करणार आहेत.