मतदानासाठी दिव्यांग - जेष्ठांना ने-आण करणाऱ्या बसमधून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 07:34 PM2019-04-20T19:34:09+5:302019-04-20T19:44:14+5:30
मतदानाच्या २९ एप्रिल रोजी जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करून त्यांचा हक्क बजवावा. जिल्ह्यात सात हजार ९४५ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये,म्हणून त्यांना जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर आदी शहरांमध्ये निवडणूक यंत्रणेने बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शहरात २० बसेस व ग्रामीण भागात ७४० रिक्षांची मोफत सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. या बससेचे संबंधीत मतदान केंद्रांजवळ बस थांबे ही निश्चित केले
ठाणे : मतदानाच्या दिवशी दिव्यांगाना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी जिल्ह्यातील शहरांमध्ये मोफत बसेस व ग्रामीणमध्ये रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांजवळ बस थांब्यांचे निश्चित केले आहेत. या बस मार्गांची पाहाणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वत: या दिव्यांग मतदारांच्या बसमध्ये बसून शहरातील मतदार केंद्रांच्या बस थांब्यांचा आढावा शनिवारी सायंकाळी घेतला.
मतदानाच्या २९ एप्रिल रोजी जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करून त्यांचा हक्क बजवावा. जिल्ह्यात सात हजार ९४५ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये,म्हणून त्यांना जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर आदी शहरांमध्ये निवडणूक यंत्रणेने बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शहरात २० बसेस व ग्रामीण भागात ७४० रिक्षांची मोफत सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. या बससेचे संबंधीत मतदान केंद्रांजवळ बस थांबे ही निश्चित केले आहेत, असे नार्वेकर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर पत्रकारांसह त्यांनी दिव्यांग मतदारांच्या या बसेस मध्ये बसून मतदान केंद्राजवळ निश्चित केलेल्या बस थांब्यांची देखील प्रत्येक्ष पाहाणी केली.
जिल्हाधिका-यांसमवेत या बसमध्ये दिव्यांग मतदारांचे आयकॉन अशोक भोईर, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी, नोडल अधिकारी रेवती गायकर, आरटीओ अधिकारी व दिव्यांगाना मतदानाच्या दिवशी सेवा देण्यासाठी तत्पर राहणारे नोडल अधिका-यांचा देखील समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून निघालेली ही बस एम्प्लॉयमेंट आफिसजवळील आठ मतदान केंद्रांच्या थांब्यासह सेंट जॉन्स हायस्कूल जवळील चार केंद्र, दगडी शाळा, महाराष्ट्र विद्यालय न्यू इंग्लीश स्कूल आदी ठिकाणी असलेल्या २४ मतदान केंद्रांच्या बस थांब्यांचा आढावा यावेळी जिल्हाधिका-यांनी घेतला. सुमारे ४० मिनीटांच्या प्रवासात एक बस ६७ मतदान केंद्रांवरील दिव्यांग मतदार व जेष्ठ नागरिक मतदारांना ने आण करणार आहेत. अशा २० बसेस ठिकठिकाणच्या शहरात धवणार आहेत. तर ग्रामीण भागात या मतदारांसाठी ठिकठिकाणी ७४० रिक्षा धावणार आहेत. बस किंवा रिक्षा उपलब्ध न झाल्यास दिव्यांग मतदारांनी १९५० या हेल्पलाइनवर तत्काळ संपर्क साधून वाहन उपलब्ध करून घेता येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले.