ठाणे जिल्ह्यात दीड दिवसाच्या पावणेचार लाख गणरायांना भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:37 PM2018-09-14T22:37:16+5:302018-09-14T22:47:23+5:30

दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ गणरायांना ठाण्यासह उपनगरातील भाविकांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.

In Thane district the devotees of the devotees of Parnaikan lakhs of devotees for a day and a half | ठाणे जिल्ह्यात दीड दिवसाच्या पावणेचार लाख गणरायांना भावपूर्ण निरोप

ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन

Next
ठळक मुद्दे पर्यावरण संवर्धनास प्राधान्य ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन

ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात मोठ्या भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी दीड दिवसासाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ ठाणेकरांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी थेट तलावांमध्ये विसर्जन करण्याऐवजी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.
ठाणे महानगरपालिकेने यावर्षीही इकोफ्रेण्डली गणेशोत्सव संकल्पना राबवून गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजिनीवाडी, बाळकुम, खारेगाव आदी कृत्रिम तलावांचा यामध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे तलाव परिसरात ठिकठिकाणी निर्माल्यकलशही उभारले होते. तसेच वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युतव्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्हींद्वारे पोलिसांनी विशेष निगराणी ठेवली होती. प्रत्येक विसर्जन तलावांच्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला खासगी कार्यकर्ते होते.
विसर्जनावर कुठेही अनुचित प्रकार झाला नाही. सर्वत्र भक्तांनी गुलालासह पुष्पपाकळ्यांची उधळण करून आणि ढोलताशांचा गजर करत आवडत्या बाप्पाची अखेरची आरती ओवाळून विसर्जन केले.
* सहा महापालिकांच्या विसर्जन घाटावर भक्तांची गर्दी
दीड दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजा केल्यानंतर पर्यावरणाभिमुख गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेसह आयुक्तालयातील सहाही महापालिकांनी केलेल्या विशेष विसर्जन घाटांचा गणेशभक्तांनी आवर्जून लाभ घेतला. ठाणे शहर पोलीस आयुक्यालयातील पाच परिमंडळांतर्गत तीन सार्वजनिक, तर ३८ हजार ५७७ घरगुती गणरायांना तसेच ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातील २९ सार्वजनिक, तर १४ हजार २०० बाप्पांना निरोप दिला.
परिमंडळनिहाय असे झाले विसर्जन
परिमंडळ १- ठाणे शहर -५६ हजार १९०
* परिमंडळ - २ भिवंडी : ३२ हजार ६०१
* परिमंडळ - ३ कल्याण : एक लाख २२ हजार ३००
* परिमंडळ - ४ उल्हासनगर : ८४ हजार ७०१
* परिमंडळ -५ वागळे इस्टेट : ८३ हजार ८१

Web Title: In Thane district the devotees of the devotees of Parnaikan lakhs of devotees for a day and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.