ठाणे जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान- जिल्हाधिकारी
By सुरेश लोखंडे | Published: September 24, 2022 05:45 PM2022-09-24T17:45:41+5:302022-09-24T17:46:47+5:30
महिलांमध्ये सुरक्षितता व आरोग्य विषयक जागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागानेनवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर
ठाणे :
महिलांमध्ये सुरक्षितता व आरोग्य विषयक जागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागानेनवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान हाती घेतले आहे. २६ सप्टेंबरला या अभियानाचा शुभारंभ होणार असून ते ५ आॅक्टोबरपर्यंत जिल्हाभर राबवण्यात येणार आहे. या कालावधीत १८ वर्षावरील महिला, मातांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात सुरक्षिततेची जनजागृती केली जाणार असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.
'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानाच्या पूर्व नियोजनासाठी आज जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर व मुरबाड आदी तालुक्यांच्या ग्रामीण भाग आणि बदलापूर व अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरांमध्ये सर्व ग्रामीण व नागरी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र च आरोग्य वर्धनी केंद्रात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व महिला, माता, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करणे, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याशिवाय सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन केले जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.
वैद्यकिय अधिकाºयांकडून गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ए.एन.एम,आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, एन.एस.एस, रोटरी क्लब, एनसीसी, नर्सिंग कॉलेज, एम.एस.डब्ल्यू कॉलेज, नेहरू युवा केंद आणि स्थानिक स्वयंसेवी संघटना आदींच्या सहकायार्ने जनजागृती करण्यात येईल. या जिल्ह्याभरातील या अभियानाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, सभापती वंदना भांडे आदी अधिकाºयांसह पदाधिकाºयांचे मार्गदर्शन लाभले आहे.