वीक एंडच्या नियोजनावर पाणी; जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी शनिवार, रविवार कार्यालयात! 

By सुरेश लोखंडे | Published: February 23, 2024 09:48 PM2024-02-23T21:48:57+5:302024-02-23T21:49:10+5:30

कर्मचारी,अधिकार्यांमध्ये नाराजीचा सुर ऐकायला मिळत आहे.    

thane district government officials employees saturday sunday in the office | वीक एंडच्या नियोजनावर पाणी; जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी शनिवार, रविवार कार्यालयात! 

वीक एंडच्या नियोजनावर पाणी; जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी शनिवार, रविवार कार्यालयात! 

सुरेश लोखंडे, ठाणे:  'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम कल्याण येथे ३ मार्च रोजी आयोजित केला आहे. या  कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कामांचे, योजनांच्या लाभार्थ्यांंच्या तृटी दूर करुन त्यांना पात्र ठरवण्याची काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदार, जिल्हा परिषद,पंचायत समित्यां आदींच्या नियंत्रणातील कर्मचार्यांना या शनिवार, रविवारच्या सुट्यांंचे दोन  कार्यालयात येऊन रखडलेले कामे पूर्ण करायचे आहे, तसे आदेश संध्याकाळी उशिरापर्यंत संबंधित वरिष्ठांकडून जारी झाले आहे. त्यामुळे कर्मचारी,अधिकार्यांमध्ये नाराजीचा सुर ऐकायला मिळत आहे.       

'शासन आपल्या दारी ' या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जात आहे. आजही सायंकाळी ही आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान या कार्यक्रमास अनुसरून रखडलेले, प्रलंबित असलेले कामे पूर्ण करण्यासाठी सुटीच्या शनिवार, रविवारी ही अधिकारी, कर्मचार्यांना कार्यालयात येण्याचे फर्मान जारी झाले आहेत. अन्यथा शिस्त भंगाची कार्यवाही करण्याचें संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे  तर्कवितर्क काढले जात आहेत.            

जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालये, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यां आदीच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हा शनिवार, रविवारचा वीक एंड आता कार्यालयातच जाणार असल्याचे ऐन संध्याकाळी उघड झाले. त्यामुळे त्यांच्या नियोजन कार्यक्रमावर पाणी फिरल्याचे काहींकडून खासगीत ऐकवले जात आहे.

या कार्यालयातील आदेशानुसार आता सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी,  शिपाई व कोतवाल यांनाहीज्ञ  शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत कार्यक्रम राबवायाचा असल्याने २४ व २५ फेब्रुवारी या सुटीच्या दिवशीही कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहुन कामकाज करावयाचे आहे. या  कामचा आढावा हा शासन स्तरावरुन घेत असल्याने नमुद कामात हलगर्जिपणा केल्यास व कार्यालयात गैरहजर असल्यास त्यांचेविरूध्द महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्यास वरिष्ठांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वीक एंड चा आनंद धुळीस मिळाला आहे.

Web Title: thane district government officials employees saturday sunday in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे