ठाणे जिल्ह्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीच्या १३ जागांसह सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज नाही!
By सुरेश लोखंडे | Published: May 13, 2023 06:03 PM2023-05-13T18:03:19+5:302023-05-13T18:03:30+5:30
जिल्ह्यातील ११ ग्राम पचयांतीच्या या पाेट निवडणुकीच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या १२ जागांचा समावेश आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील ११ ग्राम पंचायतींच्या २५ जागांसाठी व एका ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची पाेटनिवडणूक घाेषीत झालेली आहे. १८ मे राेजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. मात्र एका सरपंच पदासाठी अर्ज दाखल झालेली नाही. तर सदस्यांच्या १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज आलेला नाही. सहा जागा बिनविराेध आलेल्या आहेत. तर उर्वरीत चार ग्राम पंचायतींच्या सहा जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.
जिल्ह्यातील ११ ग्राम पचयांतीच्या या पाेट निवडणुकीच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या १२ जागांचा समावेश आहे. याशिवाय शहापूरच्या आठ जागा, कल्याणमधील तीन आणि अंबरनाथच्या दाेन जागांसाठी ही निवडणूक हाेईल. पण या २५ जागांपैकी १३ जागांसाठी उमेदवारी प्राप्त झाली नाही. सहा जागां बिनविराेध आलेल्या आहेत. तर आता फक्त चार ग्राम पंचायतींच्या केवळ सहा जागांसाठी मतदान हाेणार आहे.
बिनविराेध निवडून आलेल्यांमध्ये भिवंडीच्या बाेरीवली ग्राम पंचायतीसाठी बिनिश सुसे या महिला विजयी झाल्या आहेत. तर दापाेडे येथील सुगंधा पाटील, श्वता पाटील बिनविराेध विजयी झाल्या. वळ येथील रविता पाटील ह्यांच्यासह सचिन पाटील विजयी झाले आहेत.