ठाणे जिल्ह्यात २०२७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात

By admin | Published: August 30, 2015 11:25 PM2015-08-30T23:25:52+5:302015-08-30T23:25:52+5:30

सर्वाधिक महापालिकांचा जिल्हा म्हणून देशात नावारूपाला आलेल्या ठाणे जिल्ह्यात दोन हजार २७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. संबंधित प्रशासन

Thane district has 2027 children in the cyclone of malnutrition | ठाणे जिल्ह्यात २०२७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात

ठाणे जिल्ह्यात २०२७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात

Next

सुरेश लोखंडे, ठाणे
सर्वाधिक महापालिकांचा जिल्हा म्हणून देशात नावारूपाला आलेल्या ठाणे जिल्ह्यात दोन हजार २७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. संबंधित प्रशासन यावर उपायांचा दावा करीत असले तरी तो फोल ठरला आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी ६० लाख दहा हजार असून त्यापैकी सर्वाधिक शहरी भागात वास्तव्याला आहेत. महापालिकांचे क्षेत्र चोहोबाजूने विस्तारलेले असतानाही या जिल्ह्यात अद्यापही दोन हजार पेक्षा जास्त बालके कुपोषित जीवन जगत आहे. जिल्ह्यातील ठाणे हा संपूर्ण शहरी लोकवस्तीचा तालुका असतानाही त्यात २० बालके कुपोषित आहेत.
यानंतर कल्याण तालुकाही बहुतांशी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असताना त्यामध्येही १३९ बालके कुपोषित आढळली आहेत. महापालिका क्षेत्रालगतही परिस्थिती असून नगरपालिका, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही कुपोषित बालके जीव मुठीत घेऊन जगत आहेत. ही स्थिती भूषणावह नाही.

विकासाच्या जोरावर नगर पंचायत म्हणून उदयाला आलेल्या शहापूर, भिवंडी व मुरबाड या दोन्ही तालुक्यात तर सर्वाधिक बालके तीव्र कुपोषीत आहेत. शहापूर तालुक्यात ३० हजार ७२० बालकांचे आरोग्य संवंर्धक पध्दतीने वजन केले असता त्यामध्ये तीव्र कमी वजनाची म्हणजे कुपोषित एक हजार ७९ बालके आढळले आहेत. वजन केलेल्यांपैकी ७ टक्के बालकेही कुपोषीत आहेत.

महापालिका असलेल्या भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या भिवंडी तालुक्यातील ४० हजार ९८५ बालकांचे वजन केले असता त्यात ७४४ बालके कुपोषित असल्याचे उघड झाले आहे.
मुरबाड या नगरपंचायतीच्या विकसित शहरालगतच्या ग्रामीण दुर्गम भागात २७८ बालके कुपोषित आहेत सुदृढ बालकांच्या संख्येपैकी तीन टक्के बालके कुपोषीत आहेत.

हे वास्तव असताना प्रशासन कुपोषणाचा बिमोड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा दावा महिला- बाल विकास विभागासह आरोग्य विभाग करीत असून तो यामुळे फोल ठरला आहे.

Web Title: Thane district has 2027 children in the cyclone of malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.