ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 42 टक्के मतदान, 392 जागांपैकी 27 जागांसाठी उमेदवार नसल्याने नाही झालं मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 03:03 PM2017-10-16T15:03:17+5:302017-10-16T15:04:11+5:30
जिल्ह्यातील 41 पैकी 35 ग्राम पंचायतींसाठी (ग्रा.पं.) मतदान सुरू आहे. सुमारे 235 सदस्यांसह सरपंच पदासाठी मतदान होत आहेत.
ठाणे - जिल्ह्यातील 41 पैकी 35 ग्राम पंचायतींसाठी (ग्रा.पं.) मतदान सुरू आहे. सुमारे 235 सदस्यांसह सरपंच पदासाठी मतदान होत आहेत. 57604 मतदानापैकी 11.30 वा.पर्यंत 42 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील या 35 ग्रा. पं.च्या ५७ हजार ६४० मतदानापैकी 31098 मतदान झाले आहे. 123मतदान केंद्रावरील यामतदानासाठी सुमारे 450 बॅलेट युनिट, तर 230 कंट्रोल युनिटचा वापर होत आहे. याशिवाय त्यांच्यासाठी 240 बीएमएम म्हणजे मेंंब्री युनिट देखील उपलब्ध आहेत. सरपंच पदासाठी सुमारे 174 उमेदवार आहेत. तर सदस्य निवडीसाठी 747 उमेदवार नशिब अजमावत आहेत. ग्राम पंचायतींच्या 392 जागांपैकी 27 जागांसाठी उमेदवारी अर्जच आले नाहीत. 41 पैकी सहा ग्रा. पं.च्या सरपंच पदासाठी मतदान नाही. यातील काही जागांचे नामनिर्देशनपत्र अपात्र ठरवण्यात आले. तर काही बिनविरोध झाल्यामुळे या सहा सरपंचासाठी आता मतदान होत नाही. दोन ग्राम पंचायतींसाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. सदस्य पदांसाठी नाही मात्र सरपंच पदासाठी दोन ग्रा. पं.मध्ये मतदान आहे. जिल्ह्याभरात सरपंच पदासह सदस्यांसाठी 35 ग्रा. पं.मध्ये आज मतदान होत आहे. तर सहा ग्रा. पं.च्या फक्त सदस्यांसाठी मतदान होणार आहे. शहापूर तालुक्यातील पाच ग्रा.पंच्या 44 जागांपैकी केवळ नऊ जागांसाठी मतदान सुरू आहे. 14 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर 21 जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. यामध्ये केवळ तीन ग्राम पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. उर्वरित लवले व नांदवळ या दोन ग्राम पंचायतीं एसटी प्रवर्गाच्या उमेदवारासाठी राखील आहेत. मात्र त्यासाठी एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. कल्याण तालुक्यातील आठ ग्रा.पं.च्या 74 जागांसाठी मतदान होत आहे. 29 जागा बिनविरोध आल्या असून 44 जागांसाठी मतदान सरू आहे. एका जागे करीता उमेदवारी अर्जच आलेला नाही. सुमारे 65 उमेदवार नशिब अजमावत आहेत. भिवंडीच्या 14 ग्रा.पं.च्या 158 जागांसाठी निवडणूक आहेत. यापैकी 25 जागा बिनविरोध आल्या असून एका जागेसाठी उमेदवारी अर्ज आला नाही. यामुळे आता केवळ 132 जागांसाठी मतदान आहे. याप्रमाणेच मुरबाड तालुक्याच्या 10 ग्रा.पं.च्या 116 जागांसाठी निवडणूक होत आहेत. यापैकी चार जागांसाठी उमेदवारी अर्ज प्राप्त नाहीत. तर 62 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता केवळ 50 जागांसाठी मतदान आहे. त्यासाठी 103 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.