ठाणे जिल्ह्यात वर्षातील सर्वाधिक सहा हजार ७७ कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 09:32 PM2021-04-04T21:32:56+5:302021-04-04T21:36:17+5:30

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या सहा हजार ७७ इतकी चालू वर्षभरातील विक्रमी रु ग्णांची वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. याशिवाय, रविवारी १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Thane district has the highest number of 6,077 corona patients in a year | ठाणे जिल्ह्यात वर्षातील सर्वाधिक सहा हजार ७७ कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

चिंता आणखी वाढली

Next
ठळक मुद्देचिंता आणखी वाढली १७ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या सहा हजार ७७ इतकी चालू वर्षभरातील विक्रमी रु ग्णांची वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. याशिवाय, रविवारी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता तीन लाख ३८ हजार ७४३ रु ग्णांची नोंद झाली असून, मृतांची संख्या सहा हजार ५६१ इतकी नोंदली गेली आहे.
ठाणे शहरात एक हजार ७०१ रु ग्ण आढळल्याने येथील रु ग्णसंख्या आता ८३ हजार ८२६ च्या घरात गेली आहे. पाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ४६६ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत एक हजार ६९३ रु ग्णांची वाढ झाली. तर तिघांच्या मृत्यूमुळे ८४ हजार ११६ रु ग्ण बाधित असून, एक हजार २६९ मृत्यूंची नोंंद झाली आहे.
उल्हासनगरमध्ये १५९ रु ग्ण आढळले. एकाच्या मृत्युमुळे येथील बाधितांची संख्या १४ हजार ५७२ तर मृतांची संख्या ३८१ झाली आहे. भिवंडीमध्ये १०४ बाधित आढळले. शनिवारप्रमाणेच रविवारी देखिल याठिकाणी एकही मृत्यू नाही. आता बाधितांची संख्या आठ हजार ९२ असून, मृतांची संख्या ३६३ कायम आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ३४०
रु ग्ण आढळले असून पाच मृत्यू आहेत. या शहरात बाधितांची संख्या ३१ हजार ९९५ असून, मृतांची संख्या ८३८ वर गेली आहे.
अंबरनाथमध्ये २०३ रु ग्ण रविवारी आढळले. सुदैवाने एकही मृत्यू नाही. येथे बाधित ११ हजार ५१६ असून मृत्यू ३२० कायम आहेत. बदलापूरमध्ये २८६ रु ग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १३ हजार १६८ झाले असून, एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२५ आहे. ग्रामीणमध्ये तब्बल १५०
रु ग्णांची वाढ झाली असून सुदैवाने एकही मृत्यु नाही. आता बाधित २१ हजार ३५४ आणि आतापर्यंत ६१० मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title: Thane district has the highest number of 6,077 corona patients in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.