ठाणे जिल्हा रुग्णालय, मुंबईला रक्ताचा तुटवडा; रक्तदात्यांची प्रतिक्षा

By सुरेश लोखंडे | Published: November 18, 2023 07:54 PM2023-11-18T19:54:16+5:302023-11-18T19:55:20+5:30

रक्तसाठा आवश्यक तो होईपर्यंत ही रक्तदान मोहीम दररोज सुरू राहणार आहे. या आवाहन अनुसरून ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी आज या मोहिमेत सहभाग घेतला आहे

Thane District Hospital, Mumbai has a shortage of blood; Waiting for blood donors | ठाणे जिल्हा रुग्णालय, मुंबईला रक्ताचा तुटवडा; रक्तदात्यांची प्रतिक्षा

ठाणे जिल्हा रुग्णालय, मुंबईला रक्ताचा तुटवडा; रक्तदात्यांची प्रतिक्षा

ठाणे : सध्या ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यांची ही रक्ताची गरज दूर करणे आवश्यक आहे. मात्र रक्त साठा कमी पडत आहे.  त्यासाठी रक्तदान मोहीम ठाणे सिव्हिल रुग्णालयातील रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे सुरु केली. ठाणेकरांसह अन्यही रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णांची ही गरज भरुन काढण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाँ. कैलाश पवार यांनी केले आहे.

रक्तसाठा आवश्यक तो होईपर्यंत ही रक्तदान मोहीम दररोज सुरू राहणार आहे. या आवाहन अनुसरून ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी आज या मोहिमेत सहभाग घेतला आहे.अन्य रक्तदात्यांनीही रक्तदान करुन  या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, डॉ. स्मिती आडे, डॉ. सायली लखोटे, डॉ. योगेश बडक, वरिष्ठ नर्स शीला भंडारे, टेक्निशियन सुजाता होले, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन अय्यर, जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक राजू भोये हे उपस्थित होते. रक्तदान केल्यानंतर रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. चौधरी, डॉ. स्मिती आडे यांच्या हस्ते सानप यांना प्रशस्तिपत्र व रक्तदाता नोंदणी कार्ड देवून सन्मानित करण्यात आले.

या रक्तदान मोहिमेत जास्तीत जास्त शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी, युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करुन  या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन रक्तदाते सानप व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.

Web Title: Thane District Hospital, Mumbai has a shortage of blood; Waiting for blood donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.