ठाणे जिल्ह्यात एक हजार ६९७ कोरोना रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:56+5:302021-05-15T04:38:56+5:30
ठाणे : शुक्रवारी एक हजार ६९७ रग्ण सापडल्याने आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार लाख ९७ हजार ८१० झाली आहे, ...
ठाणे : शुक्रवारी एक हजार ६९७ रग्ण सापडल्याने आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार लाख ९७ हजार ८१० झाली आहे, तर ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आठ हजार ३७० नोंदली गेली आहे.
ठाणे मनपाच्या परिसरात ३२५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या एक लाख २५ हजार ८७४ झाली, तर सात दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ७९० वर गेली आहे. कल्याण-डोंबिवलीला ५५८ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २८ हजार ९३० झाली. दिवसभरातील २० मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ६४४ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.
उल्हासनगरला ७६ रुग्णांच्या वाढीसह दोन मृत्यू झाले. आता येथील रुग्णसंख्या १९ हजार ६७८ झाली असून ४५५ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला २२ रुग्ण सापडले असून चार मृत्यू झाले आहेत. येथील एकूण रुग्ण १० हजार २०० झाले असून मृत्यू ४१४ नोंद झाले. मीरा-भाईंदरला १६६ रुग्णांसह आठ मृतांची वाढ झाली. आता येथील रुग्णसंख्या ४६ हजार ९०० झाली असून एक हजार १७२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथला ४१ रुग्णांच्या वाढीसह एका जणाचा मृत्यू झाला. येथील रुग्णसंख्या आता १८ हजार ७२१ झाली असून ३९६ मृतांची नोंद झाली. कुळगाव-बदलापूरमध्ये ६५ रुग्णांची भर पडून एक जण दगावला आहे. आता येथील १९ हजार ९१४ रुग्णांसह २२८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गावपाड्यांमध्ये २५३ रुग्णांसह सात मृतांची भर पडली. यामुळे परिसरात ३१ हजार ५०८ रुग्णांसह ७७९ मृत्यूंची नोंद झाली आहे.