ठाणे जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:47 AM2018-05-12T01:47:48+5:302018-05-12T01:47:48+5:30
ठाणे जिल्हा नियोजन समितीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. गुरुवारी १७ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ८ जागांवर आपले वर्चस्व राखले आहे
ठाणे : ठाणे जिल्हा नियोजन समितीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. गुरुवारी १७ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ८ जागांवर आपले वर्चस्व राखले आहे. त्यात यापूर्वी शिवसेनेच्या १० सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे ४० पैकी सर्वाधिक १८ जागा शिवसेनेने काबीज करून जिल्हा नियोजन समितीवर आपले वर्चस्व राखले आहे.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रि या पार पडली. यातील २३ सदस्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये छोट्या नागरी निर्वाचन क्षेत्रातील दोन जागा, ग्रामीण नागरी निर्वाचन क्षेत्रातील सहा जागा आणि मोठ्या नागरी निर्वाचन क्षेत्रातील १५ जागांचा समावेश आहे. त्यात मोठ्या नागरी निर्वाचन क्षेत्रातील १७ जागांसाठी सर्वसाधारणच्या ९ जागांसाठी ११ उमेदवार, मागास प्रवर्गाच्या ५ जागांसाठी ८ उमेदवार, अनुसूचित जाती (महिला) २ जागांसाठी ३ तर, अनुसूचित जमाती १ जागेसाठी २ असे २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्या जागांसाठी गुरुवारी जिल्ह्यातील सहा महापालिकांमध्ये मतदान प्रक्रि या पार पडली. यावेळी त्या महापालिकेतील ६२५ लोकप्रतिनिधींपैकी ५९७ लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ९२ टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. यामध्ये शिवसेनेने सर्वाधिक ८ जागांवर, त्यापाठोपाठ भाजपाने ६ आणि ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या आहेत.
१ अनुसूचित जाती :
राजू रामा कांबळे
२ अनुसूचित जाती (महिला)
छायाबाई अशोक वाघमारे, ज्योत्स्ना जालिंदर हसनाळे४ सर्वसाधारण :
जाफर नोमानी, यशवंत जयराम टावरे, महेश सुखरामानी, वरुण सदाशिव पाटील, निलेश शिवाजी शिंदे, शाफ मोमीन, विकास कृष्णा रेपाळे, प्रवीण मोरेश्वर पाटील, भगवान शंकर भालेराव