कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 10:12 PM2021-01-08T22:12:52+5:302021-01-08T22:26:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम शुक्रवारी राबविण्यात ...

Thane district ready for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला सराव चाचणी मोहिमेचा शुभारंभ

Next
ठळक मुद्दे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला सराव चाचणी मोहिमेचा शुभारंभ जिल्हा रुग्णालयात सहा लाख डोसची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला. लसीकरण मोहिमेसाठी ठाणे जिल्ह्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शासनाचे आदेश मिळताच तात्काळ लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने आणि त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी सराव चाचणी घेण्यात आली. जिल्हयात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहापूरचे उपजिल्हा रु ग्णालय, दीवा अंजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ठाणे महापालिका आणि भिवंडी निजामपूर क्षेत्रामध्ये दोन केंद्रावर तर उर्वरित कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा भार्इंदर येथे प्रत्येकी एका केद्रांवर अशा १२ ठिकाणी चाचणी घेण्यात आली.
कोविड-१९ मोहिमेत लाभार्थीं नोंदणी, लसीकरण सत्राचे नियोजन, प्रत्यक्ष लसीकरण सत्रासाठी लागणाऱ्या लसीच्या वितरणाच्या नोंदी, लाभार्थ्यांला लस दिल्याची नोंद, लसीकरणपश्चात गुंतागुतीची नोंद आणि लाभार्थीला लस मिळाल्याचे प्रमाणपत्र या सर्व गोष्टी केंद्र सरकारने युएनडीपीच्या कोविन अँपव्दारे होणार आहे. या मोहिमेत सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. प्रक्रि या राबविताना काही अडचणी येतात का ? हे तपासण्यात आले. लस उपलब्ध झाल्यावर कोणतीही समस्या न येता सर्व प्रक्रीया सुरळीतपणे करणे सुलभ होईल. प्रत्येक संस्थेत सरावा दरम्यान २५ आरोग्य कर्मचारी लाभार्थी म्हणून निवडले होते. यात लाभार्थीला प्रत्यक्ष कोणतीही लस किंवा इंजेक्शन न देता बाकी सर्व प्रक्रि येची पडताळणी करण्यात आली. यामध्ये प्रतिक्षा कक्ष, प्रत्यक्ष लसीकरण कक्ष आणि तिसºया खोलीमध्ये निरीक्षण गृहाची व्यवस्था करण्यात आली. लसीकरणानंतर अर्धा तास निगराणीखाली ठेऊन लाभार्थ्याला काही त्रास होतो का? याची तपासणी केली जाणार आहे. त्रास झालाच तर त्वरीत उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. आधी नोंदणी केल्यानुसार ओळखपत्राची पडताळणी करुन प्रवेश देणे आदी बाबी यावेळी तपासण्यात आल्या.
* सद्य स्थितीत ठाणे जिल्हयांतर्गत (महानगरपालिका क्षेत्र वगळता) एकुण आठ हजार ८५५ लाभार्थ्यांची कोविन अ‍ॅपमध्ये नोंद झाली असून महानगर पालिका क्षेत्र धरु न ५९ हजार ५७२ नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
* जिल्हा रुग्णालयात सहा लाख डोस ठेवण्याची क्षमता असून पाच जणांची टीम १०० जणांचे लसीकरण करील. दिवसाला किमान पाच हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दीष्ट असल्याचे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. सुरुवातीला आरोग्य सेवा त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.
जिल्हा सामान्य रु ग्णालय येथे आयोजित या कार्यक्र मास जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, आरोग्य उपसंचालक डॉ.गौरी राठोड, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अशोक कांबळे, जिल्हा दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार, डॉ. विनोद जोशी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हिरवाडे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी आदी उपस्थित होते.
* पहिला मान डॉ. जिनल रोकडे यांना मिळाला
यावेळी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉ. जिनल रोकडे यांना लसीकरणाच्या चाचणीचा पहिला मान मिळाला. त्यांच्या नोंदणीनुसार कोविन अ‍ॅपवर त्यांच्या नावाची खात्री करण्यात आली. लसीकरणानंतर पुन्हा २८ दिवसांनी दुसºया लसीसाठी येण्याचेही त्यांना सांगण्यात आले. पहिला मान मिळाल्यामुळे रोकडे यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Thane district ready for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.